भामटय़ा मांत्रिकाने महिलेला लुबाडले
By Admin | Updated: November 10, 2014 23:04 IST2014-11-10T23:04:52+5:302014-11-10T23:04:52+5:30
कधी दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने, तर कधी पोलीस असल्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लंपास करण्याच्या घटना घडतात.

भामटय़ा मांत्रिकाने महिलेला लुबाडले
पुणो : कधी दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने, तर कधी पोलीस असल्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लंपास करण्याच्या घटना घडतात. चोरटय़ांच्या या पद्धती नागरिकांना माहिती झाल्यामुळे की काय; पण हे भामटे आता मांत्रिकांच्या वेषात येऊनही चो:या करू लागले आहेत. मंत्रद्वारे तसेच लिंबू देऊन संकट दूर करतो, असे सांगून दोन भामटय़ांनी एका वृद्धेचे 57 हजारांचे दागिने लंपास केले.
याप्रकरणी राहीबाई बाबूराव आडरतराव (वय 62, रा. तळेकर वाडय़ामागे, तुकारामनगर, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी दोघा भामटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहीबाई 1 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना मुंढवा रस्त्यावरील द्वारका गार्डनजवळून जात होत्या. त्या वेळी त्यांना दोघा जणांनी थांबवले. बालाजी मंदिर कुठे आहे, अशी विचारणा केली. या भागात बालाजी मंदिर नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर आरोपींनी त्यांना कुठे जात आहात, असे विचारले. आपण दवाखान्यात जात आहोत, असे सांगितल्यावर भामटय़ांनी त्यांच्याशी गोड बोलायला सुरुवात केली. ‘‘तुम्हाला कौटुंबिक अडचणी आहेत, तुमचे आरोग्य ठीक नसते. कंबरेचा त्रस तुम्हाला आहे,’’ अशी बतावणी केली. त्यावर राहीबाई यांचा विश्वास बसला. मी हनुमानभक्त आहे, असे या भामटय़ाने राहीबाई यांना सांगितले.
4सोबत आलेल्या साथीदाराचीही इडापिडा मी दूर करणार आहे, असे म्हणून त्यांना एक रुपयाचे नाणो आणि वेलची खायला दिली. मंत्र मारून एक लिंबू देतो असे सांगून त्यांना उंबराचे झाड दाखवले. या उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारायला सांगितले. त्यांना ‘ओम नम: शिवाय’ या मंत्रचा जप करायला लावला.
4झाडाला फेरी मारायला जात असतानाच हनुमानाला स्त्रियांचे दागिने चालत नाहीत, असे म्हणून दागिने काढून ठेवायला सांगितले. त्यानुसार त्यांनी सोन्याची बोरमाळ, सोनसाखळी व अंगठी असा एकूण 56 हजार 8क्क् रुपयांचा ऐवज काढून दिला. त्या झाडाभोवती फेरी मारत असतानाच भामटे हा ऐवज घेऊन पसार झाले.
4राहीबाईंना या सर्व प्रकारामुळे धक्का बसला. त्यांना मानसिक त्रस झाल्यामुळे त्या बोलू शकल्या नाहीत. त्यांची स्थिती सुधारल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.