किरकोळ वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST2021-01-10T04:09:51+5:302021-01-10T04:09:51+5:30

सागर प्रमोद तुपे (वय ३२, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते गंभीर ...

Beating one over a minor argument | किरकोळ वादातून एकास मारहाण

किरकोळ वादातून एकास मारहाण

सागर प्रमोद तुपे (वय ३२, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ उर्फ डच्या लोढे व राज पवार (दोघे रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपे यांचे थेऊर फाटा येथे हॉटेल आहे. शुक्रवारी (दि. ८) दुपारी ४.३०च्या सुमारास सागर यांचे पुतणे रितेश सहदेव तुपे व गौरव कैलास तुपे हे हॉटेल बाहेर उभे होते.

यावेळी सोमनाथ लोंढे व राज पवार हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी सागर तुपे यांच्याकडून हॉटेलमधील खाद्यपदार्थ घेतले व बाहेर थांबले. त्यावेळी त्या दोघांनी रितेश व गौरव यांना तू आमच्याकडे काय बघतोस असे म्हणून शिवीगाळ केली. हे ऐकून सागर बाहेर आला. त्याने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी ७. ३० च्या सुमारांस लोढे व पवार हे दोघे दुचाकीवरून परत हॉटेलवर आलेे. व सागर तुपे याला मारहाण केली.

Web Title: Beating one over a minor argument