रासे येथे अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST2020-12-23T04:09:58+5:302020-12-23T04:09:58+5:30

पूजा अजय सानप (वय.२७, रा.राजगुरूनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार संपत उदाराम लोणारी, अतिष हनुमंत लोणारी, प्रकाश संतराम ...

Beating officer at Rase | रासे येथे अधिकाऱ्याला मारहाण

रासे येथे अधिकाऱ्याला मारहाण

पूजा अजय सानप (वय.२७, रा.राजगुरूनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार संपत उदाराम लोणारी, अतिष हनुमंत लोणारी, प्रकाश संतराम लोणारी, विलास उदाराम लोणारी, विकास विश्राम लोणारी, अमित हनुमंत लोणारी, विनीत विकास लोणारी, आकाश प्रकाश लोणारी (सर्व रा.रासे, ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रासे ( ता.खेड ) येथील गट नंबर ७१८,७१९,७२० या गटाची करण्यात आलेल्या शासकीय मोजणीच्या हद्दी कायम करण्यासाठी पूजा सानप, अन्नपूर्णा मधुकर चापाइत व साक्षीदार किरण चंद्रकांत काळे (रा.राजगुरूनगर), सचिन गुलाब नाईकरे ( रा.चासकमान) काम करत होते. यावेळी वरील आरोपींनी सावंत व चापाईत यांना शिवीगाळ दमदाटी केली. किरण काळे आणि सचिन नाईकरे या दोघांना काठी, दगड व हाताने लथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Beating officer at Rase