मधाच्या पैशावरून मित्रांमध्ये मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:14 IST2021-02-27T04:14:09+5:302021-02-27T04:14:09+5:30

नारायणगाव : मधाचे मोहळ विकून आलेल्या १०० रुपयांवरून दोन मित्रांमध्ये झालेल्या पैशाच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड ...

Beating among friends over honey money | मधाच्या पैशावरून मित्रांमध्ये मारहाण

मधाच्या पैशावरून मित्रांमध्ये मारहाण

नारायणगाव : मधाचे मोहळ विकून आलेल्या १०० रुपयांवरून दोन मित्रांमध्ये झालेल्या पैशाच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. ही घटना जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळी येथे घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नारायणगाव पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली आहे.

नामदेव तिरसिंग भिल्ल ऊर्फ मोरे (रा. पारगाव तर्फे आळी, ता. जुन्नर, मूळ रा. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव येथे खंडोबा मंदिराच्या पायथ्याला सचिन जाधव व नामदेव भिल्ल यांच्यात मधाच्या मोहळ विकलेल्या १०० रुपयांवरून गुरुवारी वाद होऊन बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीत नामदेव भिल्ल याने सचिन जाधव यांच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी करून नामदेव हा पळून गेला होता. त्यानंतर सचिन जाधव हा खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी तपास सुरू करून नामदेव भिल्ल ऊर्फ मोरे याला पारगाव तर्फे आळी परिसरातून अवघ्या ४ तासांत ताब्यात घेतले.

Web Title: Beating among friends over honey money