‘बीट मार्शल’च्या गस्तीवर राहणार लक्ष

By Admin | Updated: January 24, 2017 02:37 IST2017-01-24T02:37:26+5:302017-01-24T02:37:26+5:30

शहरातील अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांची गस्त अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी पोलीस चौकीस्तरावर

The Beat Marshall will be in the heart of the city | ‘बीट मार्शल’च्या गस्तीवर राहणार लक्ष

‘बीट मार्शल’च्या गस्तीवर राहणार लक्ष

पुणे : शहरातील अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांची गस्त अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी पोलीस चौकीस्तरावर ‘बीट मार्शल’ नेमण्यात आलेले आहेत. या गस्तीवरील पोलिसांच्या दिवसभरातील ‘गस्ती’वर आता मॉनिटरिंग अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून दिवसभरातील सर्व कामाची माहिती वरिष्ठ निरीक्षकांना एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
शहरामध्ये पोलिसांचा वावर वाढायला हवा, तसाच तो दिसायलाही हवा. नागरिकांनी मदतीसाठी फोन करताच तत्काळ घटनास्थळी दाखल होण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी चार याप्रमाणे १६० बीट मार्शल नेमण्यात आले आहेत, तर ३० महिलांचे दामिनी पथकही तयार करण्यात आलेले आहे. दुचाकीवरून हे सर्व पोलीस हद्दीमध्ये गस्त घालतात. संशयास्पद व्यक्तींकडे चौकशी करणे, वाहनांची आणि कागदपत्रांची तपासणी करणे, अपघातस्थळी दाखल होणे, अडचणीतील नागरिकांना मदत पोहोचवणे अशी कामे मार्शलद्वारे केली जातात. (प्रतिनिधी)

Web Title: The Beat Marshall will be in the heart of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.