मिरचीची भुकटी तोंडावर मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:11 IST2021-03-10T04:11:56+5:302021-03-10T04:11:56+5:30

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मोहन पवार हे चांडोली बुद्रुक येथे लोहारकाम करत असतात. त्यांच्याकडे असलेल्या दोन म्हशी ...

Beat the chili powder in the mouth with batons | मिरचीची भुकटी तोंडावर मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण

मिरचीची भुकटी तोंडावर मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मोहन पवार हे चांडोली बुद्रुक येथे लोहारकाम करत असतात. त्यांच्याकडे असलेल्या दोन म्हशी ते विकण्यासाठी चाकण येथील

जनावरांच्या बाजारात घेवून गेले होते.त्यावेळी त्यांना त्यांच्या ओळखीचे असणारे पोपट महादु पवार (रा. पिंपळगाव ता. आंबेगाव) व सुरेश रामचंद्र चव्हाण ( रा. कार्ला फाटा लोणावळा ) हे दिसले होते. तक्रारदार याने आपल्या दोन म्हशी 70 हजार रुपयांना विकून ते पुन्हा चांडोली येथे घरी परत निघाले. मंचर येथे टेंपोतुन उतरल्यानंतर ते पायी चालत जुना चांडोली रस्त्याने घरी जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर

पोपट महादु पवार व सुरेश चव्हाण हे दोघे आले. तक्रारदार यांच्या जवळ गाडी थांबवून पोपट पवार यांनी त्याच्या खिशातील मिरचीची भुकटी ज्ञानेश्वर पवार यांच्या तोंडावर मारत त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर सुरेश चव्हाण याने मोटरसायकलच्या सीट खाली ठेवलेला

लोखंडी कोयता काढून पैसे दे नाहीतर तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. तसेच शर्टाच्या खिशात हात

घालून खिशातील 70 हजार रुपये

काढून घेतले. याबाबत ज्ञानेश्वर मोहन पवार यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Beat the chili powder in the mouth with batons