शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बियर्ड डे! क्लीन शेव्ह नको; सध्या ‘ट्रीम’चा जमानाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 01:48 IST

वर्ल्ड बियर्ड डे आज : बॉलिवूड, क्रिकेटवीरांची क्रेझ कायम

युगंधर ताजणे

पुणे : ओळखलंत का मला रस्त्यावर भेटला कुणी, दाढी होती त्याने वाढवलेली, केस होते पिंजारलेले..? एखाद्या दशकापूर्वी कॉलेजच्या आवारात, कँटीनमध्ये, विविध उद्यानांमध्ये भरगच्च दाढीवाले युवक सहजासहजी दिसायचे. त्या वेळी त्यांना ‘देवदास’, ‘आवारा’ या नावांची ओळख ठरलेली. काळाचा महिमा मोठा अगाध. बदलत्या जमान्यानुसार दाढीलादेखील साजूक, नाजूक, सोज्वळतेचे रूप आले. पूर्वी प्रेमभंग झालेला किंवा परीक्षेत नापास झालेला हेच दाढी ठेवायचे. ज्येष्ठांकडून त्या दिवसांच्या आठवणींचा पट अजूनही उलगडला जातो. आता मात्र काहीही झालं तरी ‘क्लीन शेव्ह’ नकोच, असा ट्रेंड वाढत असून, ट्रीमचा जमाना आला आहे.

बॉलिवूडच्या एकापेक्षा एक चित्रपटांची क्रेझ युवकांच्या मनावर असल्याने त्यात दाढीचा नव्याने समावेश झाला आहे. शहरातील हेअर पार्लरमध्ये तर दाढी वेगवेगळ्या आकारांत कोरण्यासाठी गर्दी पाहावयास मिळते. कुणाला बॉक्स टाइपची, तर कुणाला व्ही शेपची, कुणाला रेन्सो लुक यापेक्षा वेगळं म्हणजे ट्रंगल शेपमधील दाढीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याविषयी आठ ते दहा वर्षांपासून हेअर स्टायलिश म्हणून काम करणाऱ्या शुभम शिंदेला विचारले असता तो सांगतो, की तरुणांमध्ये विराट कोहली आणि बॉडी बिल्डर रोमन हेन्स यांच्या दाढीची प्रचंड क्रेझ आहे. सरासरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक क्लीन शेव्हपेक्षा ती ट्रीम करण्यास प्राधान्य देतात. बहुतांश जण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखी दाढी ठेवतात. मात्र, त्या प्रकारच्या दाढीसाठी वेळ द्यावा लागतो. ज्याप्रमाणे केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या केशकलपने रंगवले जाते, त्याच रीतीने हल्ली दाढीदेखील ‘ब्लू’, ‘ग्रीन’ अशा रंगांच्या शेडमध्ये रंगवली जाते.पूर्वी दाढी राखणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य स्थिर नाही, असा सरसकट अर्थ लावला जाई. आता दाढी करून गुळगुळीत झालेला चेहरा पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. खासकरून आयटी जॉब, मार्केटिंग फिल्ड, फिल्ममेकर्स, आर्टिस्ट आदीप्रकारच्या व्यवसायांमध्ये दाढी हे सिम्बॉल बनले आहे.विराटची दाढी ... सॉलिड भारीआपल्या दाढीचा विमा उतरविल्याच्या बातमीमुळे विराट कोहली चर्चेत होता. मात्र, यामुळे यंग क्राऊडमध्ये दाढी क्रे झ भयंकर वाढली. आताही बॉलिवूडमधील अनेक मातब्बर कलाकारांपेक्षा विराटच्या दाढीची लोकप्रियता सर्वाधिक आहे.चॉकलेट नव्हे; दाढीवाला हिरो...काही वर्षांपासून प्रदर्शित झालेल्या मराठी, हिंदी चित्रपटांतील कलाकारांनी दाढी ठेवलेली दिसते. यावरून सध्या चॉकलेट नव्हे, तर दाढीवाल्या हिरोंची चलती अधिक आहे. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये दाढीची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या चेहºयाला शोभेल अशा प्रकारची दाढी ठेवण्याकडे तरुणाईचा कल आहे.- विकास चव्हाण, स्टायलिश

टॅग्स :Puneपुणे