शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दाढी, कटींग करणे पडणार महागात :सलून व्यावसायिक दरवाढीच्या पवित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 20:05 IST

जीएसटीचा आणि वाढत्या महागाईचा परिणाम सलून व्यवसायावर झाला आहे. सलून साहित्याच्या दरात वाढ झाल्याने सलून व्यवसायिकांच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी दाढी व कटिंगचा दर वाढविण्याच्या विचारात नाभिक व्यावसायिक आहेत.

 मंचर: जीएसटीचा आणि वाढत्या महागाईचा परिणाम सलून व्यवसायावर झाला आहे. सलून साहित्याच्या दरात वाढ झाल्याने सलून व्यवसायिकांच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी दाढी व कटिंगचा दर वाढविण्याच्या विचारात नाभिक व्यावसायिक आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मंचर येथे सोमवारी बैठक होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सलून ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे.   नागरिकांना दाढी, कटिंग करण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी सलूनमध्ये जावेच लागते. ठराविक नोकरदार घरच्या घरी स्वत:च्या हाताने दाढी करत असले, तरी त्यांना केस कापण्यासाठी सलूनमध्ये जावेच लागते. ही नित्याची बाब आहे. पूर्वी मंचर मध्ये दाढी करण्यासाठी ३० रुपये व कटिंगला ५० रुपये द्यावे लागत होते. परंतु आता महागाईमुळे दाढी ५० कटिंग ७० रुपये होणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका सलून असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव क्षीरसागर यांनी दिली.महाराष्ट्र नाभिक महामंडळाची विशेष सभा गोरक्षनाथ टेकडी  येथे सोमवारी होणार आहे. या सभेत दरवाढीचा निर्णय होणार असून  ही दरवाढ ६ जानेवारी पासून लागू करण्यात येणार आहे. सलून व्यवसायिकांची आर्थिक स्थिती, दुकान उपयोगी वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने संकटात आहे. त्याचप्रमाणे सलून व्यवसायासाठी लागणारे कॉस्मेटिक, मेकअप कीट, शेविंग क्रीम, पावडर व इतर वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाला तोंड देणे यापुढे शक्य होणार नसल्याने दरवाढ करावी लागणार आहे. नोटबंदी व आता ‘जीएसटी’मुळे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. त्यामुळे दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सलून व्यवसायिक सांगतात. नव्या पिढीला सलून व्यवसायाकडे वळविणे हे आमच्यासमोर आव्हान आहे. ते पेलतानाच या व्यवसायाला फॅमिली सलूनचे स्वरूप कसे देता येईल, असा नाभिक समाज प्रयत्न करत असतो कुठंतरी समाज एकत्र यावा आणि वाढते खर्च आटोक्यात यावे धंदा परवडावा म्हणून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे आंबेगाव तालुका सलून असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सांगितले.

दरवाढ ग्राहकांना मान्य नाही

मंचर शहरात  सुमारे चाळीस सलूनची दुकाने आहेत.  तर तालुक्यात एकूण चारशेच्या आसपास दुकाने असतील. आता सलून व्यवसायातही स्पर्धा आली आहे. स्थानिकांबरोबर परप्रांतीयांचे या व्यवसायात अतिक्रमण झाले आहे. परप्रांतीय सलूनवाले कमी पैशात दाढी व केस कापण्याचे काम करत असल्याने, स्थानिक व्यवसायिकांना स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. सध्या ग्राहक सलून कशी आहे? त्याची सेवा कशी आहे? हे पाहून तेथे जातो. त्यामुळे आपले सलून वातानुकूलित करणे, त्याला आधुनिकतेचा टच देणे, विनम्र सेवा देणे या बाबी व्यावसायिकांना करावा लागत आहे. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. सलून व्यवसायिकांनी केलेली दरवाढ ग्राहकांना मान्य नाही. त्यांनी या दरवाढीला विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :MancharमंचरGSTजीएसटी