विद्येचे माहेरघर ‘स्वच्छ शहर’ व्हावे !

By Admin | Updated: December 11, 2014 00:35 IST2014-12-11T00:35:38+5:302014-12-11T00:35:38+5:30

विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले.

Be the first to be a 'clean city' | विद्येचे माहेरघर ‘स्वच्छ शहर’ व्हावे !

विद्येचे माहेरघर ‘स्वच्छ शहर’ व्हावे !

पुणो : विद्येचे माहेरघर आणि आयटी सिटी असलेल्या पुणो शहराची ‘स्वच्छ शहर’ अशी नवी ओळख निर्माण व्हावी. त्यासाठी महापालिकेने लोकसहभागाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वच्छतेसाठी करावा; तसेच, विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले. 
महापालिकेतर्फे लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियानाच्या पुरस्काराचे वितरण डॉ. गाडे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसे गटनेते बाबू वागसकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप व सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी उपस्थित 
होते.  
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 74 ला (चैतन्यनगर) प्रथम क्रमांकाचा, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 68 ला दुसरा, येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक एकला तिस:या क्रमांकाचा, तर कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 26ला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी स्थानिक 
नगरसेवक, सहायक आयुक्त व आरोग्य निरीक्षकांनी पुरस्कार स्वीकारला. 
 शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी अभियानाचे लोकआंदोलन झाले पाहिजे, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविकामध्ये केले. मदन वाव्हळ यांनी सूत्रसंचालन, उपमहापौर आबा बागुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
4राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव माहिती- तंत्रज्ञानामुळे जगभर गेले आहे. अनेक गोष्टींमध्ये पुढे असलेल्या  शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, अस्वच्छता हेच रोगराईचे मूळ आहे. त्यामुळे सर्वानी मिळून स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होऊया, असे आवाहन डॉ. गाडे यांनी केले. शहरातील कच:याचा प्रश्न बिकट आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग झीरो गार्बेज करण्याची आवश्यकता 
आहे. 
4त्यासाठी कमी कचरा निर्माण करणो आणि कच:याचा पुनर्वापर करण्यासाठी चारसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षा आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Be the first to be a 'clean city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.