‘विकासकामाच्या जोरावर निवडून येऊ’
By Admin | Updated: February 13, 2017 02:09 IST2017-02-13T02:09:58+5:302017-02-13T02:09:58+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रभाग क्र. २२ मधील माळवाडी परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली. मतदारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत केले.

‘विकासकामाच्या जोरावर निवडून येऊ’
हडपसर : राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रभाग क्र. २२ मधील माळवाडी परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली. मतदारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत केले. विकासकामाच्या जोरावर बहुमताने निवडून येऊ, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, नगरसेवक चंचला कोद्रे, हेमलता नीलेश मगर, नगरसेवक बंडू ऊर्फ सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते
प्रभागात स्मार्ट इंग्लिश स्कूल, विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हे मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. विजेच्या केबल भूमिगत केल्या, रोड रिफ्लेक्टर, वैयक्तिक शौचालय बांधणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मुबलक पाणीपुरवठा, वैद्यकीय, महिला बचत भवन, अद्ययावत समाजमंदिर. व्यायामशाळा, उद्यान, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण, सोलर पथदिवे, एलईडी लाईट यांसारखी विकासकामे करण्यात यश आले. पादचारी मार्ग, मराठी शाळांची नाला चॅनलायझेशन, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेजलाइन आदी कामांवर लक्ष दिल्याने प्रभागातील समस्या सुटल्या आहेत, असे उमेदवारांनी सांगितले. (वार्ताहर)