शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

सावधान! थुंकल्यास होणार दंड-शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 2:35 AM

वानवडी व कल्याणीनगर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई

वानवडी : स्वच्छ भारत अभियान सुरू असताना आता महापालिकेच्या वतीनेच प्रत्येक प्रभागामध्ये सहायक आयुक्त कार्यालयामार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रभाग क्र. २५ वानवडी परिसरात वानवडी-रामटेकडी सहा. आयुक्त कार्यालयातील आयुक्त संजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकून घाण करणाºयांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.

आरोग्य विभागाकडून ही कारवाई वानवडी परिसरातील शिवरकर रोडवर असणाºया पानटपºया चहाची ठिकाणे, बसस्थानके, सांस्कृतिक भवन तसेच रस्त्यावरून वाहन चालवताना थुंकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत ३० जणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये १०० रुपये दंड आकारून पावती देण्यात येत होती. त्यातूनच रोख स्वरूपात जवळपास १००० रुपये दंडाची रक्कम गोळा करण्यात आली तसेच ज्यांच्याकडून दंड भरला गेला नाही, अशा व्यक्तींकडून रस्त्यावर थुंकलेले साफ करण्यात आले.रस्त्यावर थुंकून घाण करणाºयांवर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दिलावर आवटी यांनी सांगितले. ही कारवाई आरोग्य निरीक्षक प्रदीपकुमार राऊत, इरफान मोमीन, राहुलकाकडे व सहकारी यांच्या पथकाने केली.कारवाईचे स्वागत, पण सातत्य हवेवानवडी परिसरात सोमवारी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया व्यक्तींवर महापालिका आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात आली. ही कारवाई होत असताना काही व्यक्ती, महिला यांनी स्वागतही केले; परंतु एखादी मोहीम राबवली जाते आणि ती त्या काळापुरतीच ठरते. त्यामुळे असे न होता रोजच्या रोज वानवडी परिसरात अशी कारवाई होणे गरजेचे आहे.जेणेकरून थुंकूण परिसर घाण करणाºया व्यक्तींवर वचक बसेल व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडून अशी कारवाई होत असताना प्रथमत: ती सरकारी कार्यालये, दवाखाने, मनपा शाळा, दफ्तरे, सांस्कृतिक भवन अशा ठिकाणातील परिसरामध्ये थुंकणाºयांवर कारवाई व्हावी.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका