शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! अनोळखींना आधारकार्डची माहिती देताय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:52 IST

इंजिनियर मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत त्याद्वारे बँकेत गैरव्यवहार केल्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देआधारकार्डद्वारे बनावट खाते उघडून फसवणूकसुमारे एक महिन्याच्या कालावधीत त्यात ५ ते ६ गैरव्यवहार

पुणे :  नोकरीसाठी नातेवाईकांचा मोबाईल लिंक असलेले आधारकार्ड पाठविल्याने तरुणी व तिचा काका चांगलेच अडचणीत आले असून त्यांना आता न्यायालयाच्या हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे़. अनोळखी आधार कार्डची माहिती दिल्याने त्यांनी बँकेत बनावट खाते उघडून त्याद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी हर्षद यादव, अनुज कुमार आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत शिवानी कुलकर्णी (वय २२, रा़ शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी या इंजिनिअर असून त्यांनी एका वेबसाईटवर नोकरीसाठी गेल्या वर्षी जून २०१७ अर्ज केला होता़. काही दिवसांनी त्यांना एक फोन आला व त्याने एच सी एल कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले़. त्यासाठी त्यांच्याकडून ५ हजार रुपये आॅनलाईन घेतले़. त्यांचा मोबाईल आधारकार्डशी लिंक नव्हता़. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांपैकी ज्यांचा मोबाईलला आधारकार्ड लिंक असेल, त्यांचा नंबर व आधार नंबर देण्यास सांगितले़. त्याप्रमाणे त्यांनी आपले काका सतीश मारुलकर (रा़ विजयाश्री टॉवर्स, दत्तवाडी) यांना पॅनकार्ड व आधारकार्ड पाठविले़ या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यांनी कोटक महिंद्रा बँकेत काकांच्या संमतीशिवाय बँक खाते उघडले़. त्या खात्यावर गैरव्यवहार केले़. शिवानी कुलकर्णी यांना नोकरी काही मिळाली नाही़, त्यांची ५ हजार रुपयांची फसवणूक झाली़. पण, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले़. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयाचे समन्स आले़. त्यात त्यांच्या खात्यात लोकांची फसवणूक करुन मिळविलेले पैसे जमा झाले होते़. त्याबाबत त्यांनी माहिती घेतली, तेव्हा कुलकर्णी यांना बँकेत बनावट खाते उघडलेले आढळले. त्यावर त्यांच्या काकाच्या पाठविलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन इंटरनेटद्वारे बँकेत त्यांच्या नावाने बँकेत खाते उघडलेले आढळले. अन्य फसवणुकीच्या गुन्ह्यातील पैसा या खात्यावर मागविण्यात आला़. सुमारे एक महिन्याच्या कालावधीत त्यात ५ ते ६ गैरव्यवहार झाले़. त्यानंतर हे खाते बंद केले गेले़ याचा काहीही पत्ता सतीश मारुलकर यांना नव्हता़. न्यायालयाचे समन्स आल्यानंतर त्यांना हा सर्व प्रकार समजला़. तेव्हा शिवानी कुलकर्णी यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ते फसवणुकीच्या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत़.  

 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाbankबँकAdhar Cardआधार कार्डPoliceपोलिस