बावडा : राज्यामध्ये कोरोनाने तांडव सुरू केल्याने राज्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती बिकट झाले आहे. शेतमजूर, दिव्यांग यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी पँथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारने कोरोना आटोक्यात येत नसल्याने कडक निर्बंध जाहीर करून त्याचा कालावधीही आणखी वाढविला आहे. शासनाने गरिबांना तांदूळ व गहू मोफत वाटण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याबरोबरच घरगुती खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत देणे गरजेचे होते. मागील वर्षी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व स्तरांचा विचार करून मोफत धान्य पुरवठा यासह सर्वसामान्यांना व महिला भगिनींनाही आर्थिक मदत केली होती. या वेळी मात्र कोरोनाचा तीव्र प्रसार होऊन अनेकांना आपला जीव गमवावे लागत आहेत. तांदूळ गहू देताना त्याबरोबरच तेल, डाळी यांचा मोफत पुरवठा करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
———————————————————