शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुराशी झुंजत महावितरण कर्मचाऱ्यांनी सुरु केला वीज पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:26 IST

पूरस्थितीमुळे रिहे खोऱ्यांतील गावांचा पौड व पिरंगुट गावांशी संपर्क तुटला होता. दुर्गम भागात असलेल्या या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत होते.

ठळक मुद्देमुळशीतील कामगिरी : दहा गावांचा विद्युत पुरवठा केला सुरळीत

पुणे : मुळशी धरणातून मुळा नदीत तब्बल ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन रोहित्राचा विद्युत पुरवठा सुरु करण्याची धाडसी कामगिरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच, त्या मुळे खंडीत झालेल्या दहा गावांचा वीज पुरवठा देखील सुरळीत केला.  मुळशी धरणात ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे मुळशी तालुक्यातील घोटावडे पुलाजवळ असलेले रोहित्र पुराच्या पाण्यात बुडाल्याने पुढील धोका टाळण्यासाठी रिहे २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा महावितरणकडून रविवारी (दि. ४) दुपारी बंद करण्यात आला. परिणामी रिहे खोऱ्यामधील रिहे, शेळकेवाडी, घोटावडे, जवळ, कातरखडक, खांबवळी, पिंपोळीसह १० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.पूरस्थितीमुळे रिहे खोऱ्यातील गावांचा पौड व पिरंगुट गावांशी संपर्क तुटला होता. दुर्गम भागात असलेल्या या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, सहाय्यक अभियंता बी. एस. वावरे व सहकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्थेतून या दहा गावांना वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र नदीच्या पुरामध्ये बुडालेल्या रोहित्राचा वीजपुरवठा मुख्य वीजवाहिनीपासून खंडित करणे व संभाव्य धोके टाळणे अतिशय आवश्यक होते. त्या शिवाय या गावांचा विद्युत पुरवठा करणे शक्य नव्हते.  रविवारी सायंकाळी महावितरणकडून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकायार्साठी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार बोटीने जाऊन रोहित्राचा मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आखण्यात आली. सोमवारी (दि. ५) सकाळी दहा वाजता आपत्ती व्यवस्थापनाचे पथक बोटीसह सज्ज झाले. मुळा नदीत प्रवाहाच्या उलट्या दिशेला रोहित्र असल्याने ही मोहीम खडतर होती. मात्र महावितरणचे जनमित्र राहुल मालपोटे व शुभम ढिले यांनी हे आव्हान स्विकारले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमसोबत बोटीने या दोघांनी सुमारे पाऊण किलोमीटर अंतर कापले. मुसळधार पावसातच मालपोटे यांनी रोहित्राच्या खांबावर चढून मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दहा गावांचा विद्युत पुरवठा अन्य वाहिनीवरुन सुरु केला. अवघ्या चोवीस तासांत रिहे खोऱ्यातील गावांमधे वीज आली. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकातील प्रमोद बलकवडे, ओंकार बलकवडे, सनी शिर्के, नागेश धनवे, गौरव धनवे, शुभम धनवे, विष्णू गोडांबे, अमोल खानेकर, भरत गुप्ता यांनी मोहीमेला सहाय्य केले. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊस