पक्ष्यांना नाही शासनाचा आधार
By Admin | Updated: November 11, 2014 23:23 IST2014-11-11T23:23:31+5:302014-11-11T23:23:31+5:30
दुष्काळी परिस्थित शेतीचे नुकसान सोसूनही स्वत: धान्य टाकून मोरांना जगविणा:या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोरांमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे.

पक्ष्यांना नाही शासनाचा आधार
नुकसान सोसूनही शिरूरचे शेतकरी सांभाळताहेत मोर
धनंजय गावडे ल्ल शिक्रापूर
दुष्काळी परिस्थित शेतीचे नुकसान सोसूनही स्वत: धान्य टाकून मोरांना जगविणा:या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोरांमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. मात्र, शासकीय पातळीवरून उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांची मोर वाचविण्यासाठी ग्रामस्थांचीच धांदल उडते.
मोराची चिंचोली, कान्हूर, खैरेवाडी, खैरेनगर, धामारी, मलठण, गणोगाव खालसा, वाघाळे आदी परिसरात मोठय़ा प्रमाणावर मोर, लांडोर वास्तव करतात. खैरेनगर व धामारी परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे मोरांचे वास्तव्य आहे. इतर गावांतही मोठय़ा संख्येने मोर आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याबरोबर मोरांच्या खाण्यासाठी धान्याचा पुरवठा करताना स्थानिक नागरिकांची धांदल उडताना दिसते.
काहीसा दुष्काळी समजल्या जाणा:या या भागातील शेतीवर अवलंबून असणा:या शेतक:यांच्या शेतातच मोरांचे वास्तव आहे. काही प्रमाणात पिकांचे नुकसान होत असले, तरी शेतकरी एकत्रित येऊन मोरांसाठी पाणी, धान्य उपलब्ध करून देतात. सध्या फॉरेस्ट खात्याने खैरेनगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी सहाशे लिटरची टाकी उपलब्ध करून देण्यात आली असून, या टाकीत दरोज सकाळ, संध्याकाळ खैरेनगरचे सरपंच एकनाथ खैरे पाणी भरून मोरांसाठी उपलब्ध करून देतात; तर अंकुश शिंदे, वामनराव शिंदे व ग्रामस्थ सकाळ, संध्याकाळी तांदूळ व इतर कडधान्य मोरांसाठी टाकतात. अशाच प्रकारे मोराची चिंचोली येथे जय मल्हार कृषी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने पाणी व धान्य उपलब्ध करून दिले जाते.
हिवाळ्यानंतर, उन्हाळ्याच्या दरम्यान या भागातून मोठय़ा प्रमाणावर मोरांचे स्थलांतर होत असते. हे टाळण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. मागील काही वर्षात काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन खाद्य व पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले होते; परंतु सध्या ग्रामस्थांनाच मोराचे संगोपन करावे लागत असून, आर्थिक भुर्दडदेखील सहन करावा लागत आहे.
परदेशी पाहुण्यांना नाही शासकीय पाहुणचार
संतोष माने ल्ल पळसदेव
सैबेरियासारख्या दूरच्या भागातून हजारो किलोमीटरचा आश्चर्यजनक प्रवास करून उजनी जलाशय परिसरात येणा:या परदेशी पाहुणांना शासकीय पातळीवरून कोणताही पाहुणचार होत नाही. त्यांच्या सरंक्षणाचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
उजनी जलाशय हा ‘रोहित पक्षी (फ्लेमिंगो), तर भादलवाडी तलाव हा ‘चित्रबलाक’ पक्ष्यांचे वास्तव्याचे प्रमुख ठिकाण आहे. विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथल जागा अशा वास्तव्य उपयोगी गोष्टी असल्याने या दोन्ही ठिकाणी हे दोन वेगवेगळे पक्षी आपल्या ‘वसाहती’ थाटतात. त्यामुळे प्लेमिंगो व चित्रबलाक पक्षी कधी येणार, याच्या प्रतीक्षेत पर्यटक, पक्षिप्रेमी, पक्षिमित्र असतात. पक्षिमित्रंच्या मनात विशेष ठसा उमटविणारा व आपल्या दिमाखदार शैलीने मन मोहित करणारा प्लेमिंगो पक्षी. त्याला मराठी भाषेत ‘रोहित’ पक्षी म्हणतात. फ्लेमिंगो म्हणजे पक्षिमित्रंचे आकर्षण. तसा सर्वसामान्य ठिकाणी हा पाहावयास मिळणो दुर्मिळच. सैबरीयातून उत्तर मध्य आशिया, पूर्व युरोप, तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये त्यांना लागणा:या अन्नाची कमतरता निर्माण झाल्यानंतर फ्लेमिंगो मोठय़ा संख्येने स्थलांतर करतात. साधारणत: प्रतिवर्षी डिसेंबर ते मार्चदरम्यान प्लेमिंगो भारतामध्ये येऊन निरनिराळय़ा ठिकाणी वास्तव्य करतात. महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र, तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी अभयारण्य येथे दिसून येतात. उजनी जलाशय परिसरात विशेषत: डिकसळ, कुंभारगाव या पट्टय़ातही प्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसून येतात. परंतु, 10 वर्षापूर्वी ज्या संख्येने हे पक्ष्यी पाहावयास मिळत होते. ती संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवते. जलाशयातील पाणी कमी झाल्यानंतर निर्माण होत असलेल्या दलदलीत या पाहुण्यांसाठी त्यांचे विशिष्ट असे खास खाद्य निर्माण होत असते. ख:या अर्थाने परदेशी पाहुण्यांना ही एक प्रकारची मेजवानीच असते. दुसरीकडे भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव चित्रबलाक पक्ष्यांचे संपूर्ण भारतातील सर्वात मोठे सारंगगार म्हणून ओळखले जाते. नोव्हेंबरमध्ये किंवा अखेरीस या पक्ष्यांचे विणीच्या हंगामासाठी तलावाच्या ठिकाणी आगमन होते. आल्यानंतर बाभळीच्या झाडांवरती ‘घरटी’ बांधणो हे सुरुवातीचे काम असते. अन् तेथून पुढे खरा विणीचा हंगाम सुरू होतो.
इंदापूर तालुक्यात भादलवाडी तलाव व उजनी जलाशय ही दोन पक्षी वास्तव्याची प्रमुख केंद्रे आहेत. परंतु, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी शासकीय पातळीवर उदासीनता दिसून येते. वन खाते तर याकडे कुठलेच लक्ष देत नाही. उजनी आणि भादलवाडी परिसरात या पक्षांच्या शिकारीच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या. काही ठिकाणी जाळे लावलेले आढळले होते. प्रशासकीय पातळीवर अनेकदा टेहेळणी मनोरे, सुरक्षारक्षक नेमणो अशी आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही व्यवस्था नाही.
निसर्गाचे एक आश्चर्य असलेल्या या पक्षांच्या स्थलांतराचा प्रवास पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. रोहित किंवा चित्रबलाक पक्ष्याला उडताना पाहणो हादेखील एक रोमांचक अनुभव आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यातून पक्ष्यांसाठी सुविधाही निर्माण करणो शक्य होईल. परंतु, पक्षीनिरीक्षकांसाठी साध्या बोटीचीही व्यवस्था नाही. पर्यटकांना खासगी होडीचा वापर करावा लागतो.