पल्स पोलिओच्या लसीसोबत ‘आधार’
By Admin | Updated: January 28, 2017 01:16 IST2017-01-28T01:16:45+5:302017-01-28T01:16:45+5:30
जिल्ह्यातील शंभर टक्के बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने प्लस पोलिओ लसीकरणाचा आधार घ्यायचे ठरविले आहे.

पल्स पोलिओच्या लसीसोबत ‘आधार’
पुणे : जिल्ह्यातील शंभर टक्के बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने प्लस पोलिओ लसीकरणाचा आधार घ्यायचे ठरविले आहे. जिल्ह्यात येत्या १२ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणासोबतच बालकांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यात असलेल्या सर्व आधार नोंदणी मशिन या दिवशी पोलिओ बुथवर लावण्यात येणार आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक बालकांची आधार नोंदणी करून घेण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी सांगितले, की येत्या १२ फेबु्रवारी रोजी ० ते ५ वय असलेल्या सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे २७० आधार नोंदणी मशिन असून, या सर्व मशिन शहर आणि जिल्ह्यातील पोलिओ बुथवर लावण्यात येणार असल्याचे चंद्राकार यांनी सांगितले.