वडगावातील लाचखोर वनरक्षकाला अटक
By Admin | Updated: May 16, 2015 04:18 IST2015-05-16T04:18:17+5:302015-05-16T04:18:17+5:30
येथील शिरोता कार्यालयात वृक्षतोडीच्या लाकडाने भरलेली गाडी आंदर मावळातील माळेगाव येथून निगडीच्या हद्दीत जाण्यासाठी लाकूड व्यावसायिकाकडे

वडगावातील लाचखोर वनरक्षकाला अटक
वडगाव मावळ : येथील शिरोता कार्यालयात वृक्षतोडीच्या लाकडाने भरलेली गाडी आंदर मावळातील माळेगाव येथून निगडीच्या हद्दीत जाण्यासाठी लाकूड व्यावसायिकाकडे वनरक्षकाने तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी दहा हजार रुपये घेतले असून, शुक्रवारी सायंकाळी ५:३० ला दहा हजारांची लाच घेताना वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.
लाकूड व्यावसायिक महेबूब लियाकत शेख (वय ३१, रा. बिजलीनगर, चिंचवड) माळेगाव येथून वृक्षतोड करून गाडी भरून लाकडे पुण्याला जात होते. त्या वेळी आरोपी वनरक्षक पांडुरंग हरिभाऊ कोपनर (वय २३, रा. कामशेत) याने शेख यांची लाकूड वाहतूक करणारी गाडी निगडीच्या हद्दीत सोडविण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच
मागितली. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी दिली. शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास
हा प्रकार सांगितला. त्यानंतर
कारवाई झाली. (वार्ताहर)