बारामती गुन्हेशोध पथकाला बर्हिजी नाईक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:21+5:302021-03-04T04:18:21+5:30
बारामतीत जेवणाच्या बिलावरून एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणानंतर चौकशीदरम्यान त्याचे धागेदोरे हाती लागून थेट बारामती ते मध्य प्रदेश पिस्तूल ...

बारामती गुन्हेशोध पथकाला बर्हिजी नाईक पुरस्कार
बारामतीत जेवणाच्या बिलावरून एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणानंतर चौकशीदरम्यान त्याचे धागेदोरे हाती लागून थेट बारामती ते मध्य प्रदेश पिस्तूल कनेक्शन समोर येताच त्याचा उलघडा करण्यात आला होता. या वेळी गोपनीय माहितीच्या आधारे बारामतीतून पिस्तूल पुरविणाऱ्या म्होरक्यासह ११ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १२ पिस्तूलसह २० राऊंडस हस्तगत करण्यात आले होते. यामुळे पुणे जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी मानली गेली होती. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाला सर्वोत्तम गोपनीय कामगिरी बाबत बहिर्जी नाईक पुरस्कार बहाल केला आहे.
योगेश लंगुटे यांचा सन्मान करताना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते.
०३०३२०२१-बारामती-१८