बिरदवडीकरांनी पुन्हा अडविल्या कचरागाड्या
By Admin | Updated: September 25, 2014 06:19 IST2014-09-25T06:19:53+5:302014-09-25T06:19:53+5:30
वारंवार सूचना देऊनही कचरा टाकण्याचे थांबत नसल्याने आज पुन्हा बिरदवडीकरांनी गाड्या अडविल्या. तत्काळ हे प्रकार बंद करा

बिरदवडीकरांनी पुन्हा अडविल्या कचरागाड्या
आंबेठाण : वारंवार सूचना देऊनही कचरा टाकण्याचे थांबत नसल्याने आज पुन्हा बिरदवडीकरांनी गाड्या अडविल्या. तत्काळ हे प्रकार बंद करा; अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.
पाणी दूषित होत आहे, दुर्गंधी, माश्या याच्या त्रासामुळे दररोज दवाखाना करावा लागत आहे. कचरा पेटवला की धुरामुळे श्वसनाचे आजार जडत आहेत. गाड्या पुन्हा आणल्या तर मोठे आंदोलन करू, अशी तंबीही वाहनचालकांना या वेळी दिली.
बिरदवडी गावाच्या दक्षिणेला; परंतु खराबवाडी गावच्या हद्दीत उंचावर मोठी खाण आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी चाकण ग्रामपंचायत आणि राजगुरुनगर ग्रामपंचायतचा दररोजचा जमा होणारा कचरा टाकला जातो. या ठिकाणी जमा होत आहे. याचे अनेक दुष्परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत.
या ठिकाणी असणाऱ्या पवारवस्ती, काळडोकेवस्ती, फडकेवस्ती या ठिकाणांवरील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
या प्रसंगी उपसरपंच विश्वनाथ चव्हाण, आशा फडके, दिनकर काळडोके, एकनाथ पवार, दत्तात्रय चौधरी, कल्पेश पवार, प्रसाद पवार, नवनाथ फडके, मिथुन पवार, गीताराम गाडे, विठ्ठल गाडे, बळीराम गोणते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)