शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Vidhan Sabha Election 2024: चारवेळा उपमुख्यमंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? शरद पवार यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:05 IST

युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार म्हणाले.

बारामती : अन्याय काय झाला,सत्ता त्यांच्याकडे आहे. चारवेळा उपमुख्यमंत्री पद, अनेक वर्ष मंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र सांगता सभेत वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कसला अन्याय झाला,कोणाकडुन झाला,असा उपरोधिक सवाल केला आहे ? युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार यांनी यावेळी नमुद केले.विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवार पुढे म्हणाले, 'लाेकांना बदल हवा आहे, राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल,लोकांना बदल हवा आहे. मी काय ज्योतिषी नाही,जागा निश्चित सांगणार नाही. परंतु राज्यात बहुमताचे सरकार येईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.काटेवाडीत मतदानानंतर आज अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीचे सरकार राज्यात येणार असून, १७५ जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी टोला लगावला. त्यांनी फक्त १७५ सांगितल्या २८० जागा सांगायला पाहिजे होत्या,असा टोला पवार यांनी लगावला.खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपाबाबत ज्येष्ठ नेते पवार यांनी तुरुंंगात असणार्या व्यक्तीच्या आरोपाची नोंद घेण्याची गरज नाही,असे मत व्यक्त केले.तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला अस्वस`थ करणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.'

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार