बारामती टोलमुक्तीचा ठराव

By Admin | Updated: August 8, 2014 23:10 IST2014-08-08T23:10:02+5:302014-08-08T23:10:02+5:30

विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बारामती शहरातील टोलनाके बंद करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

Baramati Tollmukti's resolution | बारामती टोलमुक्तीचा ठराव

बारामती टोलमुक्तीचा ठराव

>बारामती : विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बारामती शहरातील टोलनाके बंद करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आज टोल आकारणी कायमस्वरूपी बंद करणो अथवा अवजड वाहने वगळता अन्य वाहनांना टोलमुक्त करण्याचा ठराव शासनाला पाठविण्यात येणार आहे. 
बारामतीतील दुहेरी टोल आकारणी बारामतीकरांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. याच अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व बारामती टोलवेज कंपनीने दिलेल्या पत्रच्या अनुषंगाने सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. जागा रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात द्यायची असेल, तर कच:याची विल्हेवाट लावणो आवश्यक आहे, असे प्रशासनाने सुचविले. त्यावर नगरसेवक सुभाष ढोले यांनी शहरातील नागरिकांना टोलपासून मुक्त करावे, असा ठराव करावा. बारामतीकरांना टोलमुक्तीचा दिलासा द्यावा. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुहेरी टोल रद्द केला; परंतु संपूर्ण टोलमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी केली. नगरसेवक सुनील सस्ते यांनी रस्ते विकास महामंडळाने फक्त 62 कोटी रुपये खर्च केले. आता 1क् वर्षाहून अधिक काळ टोल आकारणी केली आहे. त्यांच्या ताब्यात कोटय़वधी रुपयांची जागा आहे. त्यामुळे आता टोलमुक्त करावी, अशी मागणी केली. 
नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले, की बारामती टोलमुक्त करण्याचाच विचार आहे; परंतु त्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत. ज्या वेळी जागा देण्याचा करार झाला, त्या वेळी जागेची किंमत कमी होती. आता किंमत वाढली आहे. बारामतीकरांच्या दृष्टीने टोल बंद होणो आवश्यक आहे. कराराचे पालन करताना नगरपालिकेने 3 ठराव करून पाठवावेत. त्यानुसार राज्य शासन जो निर्णय घेईल, तो योग्य ठरेल. त्यामध्ये संपूर्ण टोलमुक्ती करणो, अवजड वाहने वगळता चारचाकी, रिक्षा, टेम्पो, एसटी बस या गाडय़ांना टोलमधून मुक्त करावे. तसेच, संपूर्ण रस्त्यांची देखभाल दुरुस्ती बारामती टोलवेजला देऊन फक्त अवजड वाहनांना टोलआकारणी करण्याचा ठराव करावा, असेही त्यांनी सुचविले. त्यानुसार ठराव करण्याची मागणी केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी टोलपासून मुक्त करावे, या दृष्टीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने मावळत्या नगराध्यक्षा जयश्री सातव यांनी, टोलच्या बाबतीत अथवा एमआयडीसीच्या पत्रबाबत पक्षाच्या बैठकीत ठरले असून, या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले. रस्ते विकास महामंडळाच्या पत्रबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच निरोप दिला होता, असेही सातव यांनी सभागृहात सांगितले. (वार्ताहर)
 
..तर बारामती संपूर्ण टोलमुक्त
दरम्यान, बारामती शहरातील दुहेरी टोल आकारणी राजकीयदृष्टय़ा अडचणीची ठरत आहे. टोल आकारणीबाबत लोकमतने वारंवार पाठपुरावा केला. मागील 2 महिन्यांपूर्वी इतर टोलनाके बंद करीत असताना बारामतीत दुहेरी टोल आकारणी 3 तासांसाठी रद्द करण्यात यावी. परंतु, त्याचा विशेष फायदा वाहनचालकांना झाला नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय बारामतीकरांना देखील अडचणीचा ठरला. त्यामुळे आता संपूर्ण टोलमुक्त बारामती विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Baramati Tollmukti's resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.