शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एसटी पाटसमार्गे सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 20:37 IST

कऱ्हा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने सासवड-जेजुरी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका एसटी महामंडळाच्या एसटीला बसला...

ठळक मुद्देबारामती, इंदापुर, फलटण, पंढरपुर यांसह विविध ठिकाणांहून बसच्या दररोज शेकडो फेऱ्यासासवड आगारातून होणारे बससंचलन दिवसभर राहिले ठप्प  

पुणे : कऱ्हा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने सासवड-जेजुरी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका एसटी महामंडळाच्या एसटीला बसला. या मार्गाने बारामती, इंदापुर, फलटण, पंढरपुर यांसह विविध ठिकाणांहून बसच्या दररोज शेकडो फेऱ्या होतात. पण या सर्व गाड्या अन्य मार्गाने वळविल्या आहेत. बारामतीला ये-जा करणाऱ्या बस पाटसमार्गे धावत असून पुलाची दुरूस्ती होईपर्यंत याचमार्गे बस धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.पुरंदर तालुक्याला मंगळवारी रात्री जोरदार पावसाने झोढपून काढले. त्यामुळे कऱ्हा नदीला पुर येवून सासवड-जेजुरी मार्गावरील पुल पाण्याखाली गेला. त्यानंतर काही वेळातच पुलाला मोठे भगदाड पडून वाहतुक ठप्प झाली. या मार्गावरून दररोज बारामती ते पुणे ही विनाथांबा बससेवा सुरू असते. तसेच इंदापुर, पंढरपुर, फलटण यांसह विविध भागातून निरामार्गे येणाऱ्या बसची संख्याही खुप आहे. त्यामुळे दररोज शेकडो बसफेऱ्या होत असतात. पण पुल खचल्याने मार्गावरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर एसटी प्रशासनाने पुण्यातून पाटसमार्गे बारामती, इंदापुर, सोलापुर, पंढरपुर व इतर ठिकाणी बस सोडल्या. तर पंढरपुर, फलटण यांसह अन्य निरामार्गे पुण्यात येणाऱ्या बस लोणंद, शिरवळमार्गे सोडण्यात येत आहेत. सासवड आगारातून होणारे बससंचलन दिवसभर ठप्प राहिले. सासवडचा पुल खचला असला तरी बसफेऱ्या रद्द केलेल्या नाहीत. पण बारामतीकडे पाटसमार्गे जाणाऱ्या विनावाहक बसचे तिकीट दर एका टप्प्याने वाढविले आहे. प्रवाशांची गर्दीनुसार बस सोडण्यात येत आहेत. सोलापुर व पुणे विभागाने मार्ग ठरवून घेतले आहेत. पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत यामार्गे बससेवा सुरू राहील, असे जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :Baramatiबारामतीriverनदीfloodपूर