शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Baramati: प्रवाशांना जादा दराने लुटणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:19 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने एसटी आगारातून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करण्याची उपप्रादेशिक परीवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, काही खाजगी वाहन चालक शासनाच्या निर्धारीत दरापेक्षा प्रवाशांची अडवणूक करून दुप्पट पैसे घेत होते...

बारामती: एसटी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जादा दराने खासगी वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांवर बुधवारी(दि १७) सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ‘लोकमत’ ने जादा दराने सुरु असलेल्या प्रवाशांच्या तक्रारीबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत उपप्रादेशिक परीवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने एसटी आगारातून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करण्याची उपप्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, काही खाजगी वाहन चालक शासनाच्या निर्धारीत दरापेक्षा प्रवाशांची अडवणूक करून दुप्पट पैसे घेत होते. पुण्यासह भिगवण, इंदापूर, फलटण, नातेपुते, मोरगाव, जेजुरी आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून जादा दराने पैसे आकारले जात होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केले होते.

यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी या जादा दराने प्रवाशी वाहतुक करणाऱ्या व्यावसायिकांची गंभीर दखल घेतली आहे. तातडीने पाटील यांनी त्यांच्या पथकासह खाजगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

उपप्रादेशिक परीवहन अधिकारी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, एसटीच्या दरानुसार प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याला जाण्यासाठी १५५ रुपए तिकीट आहे. मात्र, या प्रवासासाठी दुप्पट म्हणजे ३०० रुपये आकारणे चुकीचे आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेला दर फलक बारामती बसस्थानकावर लावण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रवाशी दर आकारणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीST Strikeएसटी संपPuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस