बारामती फार्मसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:15+5:302021-02-05T05:12:15+5:30
उंडवडी कडेपठार : डेलॉनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात ...

बारामती फार्मसी
उंडवडी कडेपठार :
डेलॉनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा संगीता प्रवीण बांदल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक गुण वाढवण्यासाठी काही पारितोषिके मागील पालक सभेमध्ये जाहीर केली होती व त्या पारितोषिकांचे वितरण आज संस्थेच्या विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये बी. फार्मसी आणि डी. फार्मसीच्या प्रथम वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बी. फार्मसीमधील हर्षदा मोरे (प्रथम क्रमांक), ओंकार गायकवाड (व्दितीय क्रमांक), मयूरी गोफणे (तृतीय क्रमांक), तसेच डी. फार्मसीमध्ये मोटे स्नेहल (प्रथम क्रमांक), राशिदा सय्यद (व्दितीय क्रमांक),अश्विनी राजपुरे आणि निनाद पवार (विभागून तृतीय क्रमाक) यांचा गौरव करण्यात आला. या पारितोषिकांचे स्वरूप प्रथम १०,०००, व्दितीय ७,००० व तृतीय क्रमांकासाठी ५००० रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या इतर कला-गुणांना वाव देण्यासाठी कै. बाबाहरी बावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला कै. बाबाहरी बावकर क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुररकारासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणा-या अभिषेक घाटगे याची निवड करण्यात आली. त्यास ५००० रूपये व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. या यशवंतांचे कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . राजेंद्र पाटील व इतर संस्था पदाधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतुल भुजबळ यांनी केले.