शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मोक्का कारवाईतील आरोपींना जीवनावश्यक वस्तू पुरवणारा अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 13:13 IST

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देआरोपींनावर भिगवण पोलिस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नांसह शस्त्र अधिनियम व दरोड्याचा गुन्हा दाखल

बारामती: मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या बाळा दराडे टोळीला फरार कालावधीत दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवत मदत करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. राजेंद्र उर्फ एक्का महादेव चौधरी (वय २०, रा. वंजारवाडी, ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बाळा दराडे टोळीवर पोलिसांनी यापूर्वीच मोक्काची कारवाई केली आहे. या टोळीतील फरार शुभम ओमप्रकाश खराडे याला गत आठवड्यातच स्थानिक गुन्हे शाखेने बारामती एमआयडीसी परिसरातून अटक केली होती. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत गावच्या हद्दीत बाळा पोपट दराडे, विजय बाळू गोफणे, शुभम ओमप्रकाश खराडे व अन्य दोन अनोळखी आरोपींवर भिगवण पोलिस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नांसह शस्त्र अधिनियम व दरोड्याचा गुन्हा दाखल होते. 

या प्रकरणातील दराडे व गोफणे यांना बारामती तालुका पोलिसांनी नाशिकच्या पंचवटीमधून अटक केली होती. तपासामध्ये आरोपींविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली होती. चौधरी हा आरोपींना मदत करत होता. तो वंजारवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीसांनी त्याला वेषांतर करीत सापळा रचून पकडले. दरम्यान आरोपीला पुढील कारवाईसाठी भिगवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीBhigwanभिगवणPoliceपोलिसArrestअटक