बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्या दि बारामती सहकारी बॅकेने यंदा भक्कम दुहेरी कामगिरी केली आहे.यामध्ये बॅंकेने निव्वळ एनपीए चे प्रमाण शुन्य ट्क्यांवर आणत नफ्यामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. दि बारामती सहकारी बँकने मार्च अखेर ३५७७ कोटींचा व्यवसाय करीत रु. ७१.०० कोटी ढोबळ नफा मिळविला आहे,अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. आर्थिक वर्ष समाप्तीच्या पार्श्वभुमीवर बॅकेचे अध्यक्ष सातव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बँकेने आजवरच्या ढोबळ नफ्यामध्ये विक्रमी वाढ केलेली असून बँकेने सर्व वैधानिक तरतुदी पूर्ण करीत रु. ११.६३ कोटीचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेची दि. ३१ मार्च २०२५ अखेरची सांपत्तिक स्थिती खालीलप्रमाणे आहे.बॅंक भागभांडवल ५३.४४ कोटी आहे,तर २ हजार १९१.१६ कोटींच्या ठेवी असून १ हजार ३८५.५२ कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे.बारामती बॅकेची देशामधील मोठ्या नागरी सहकारी बँकापैकी प्रथम १० बँकांमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यात येत आहे.तसेच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यावर बँकेचे प्रथम प्राधान्य देण्यात येणार अहे. बँकेचे कार्यक्षेत्र व शाखाविस्तार, डिजिटलायझेशनद्वारे अत्याधुनिक बैंकिंग सुविधा, जलद आणि सुरक्षित व्यवहारकर्जवाटप विस्तार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकांच्या आर्थिक गरजांनुसार विशेष उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी बॅंक कार्यरत असल्याचे अध्यक्ष सातव यांनी सांगितले.बँकेच्या प्रगतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा विकास व प्रगतीचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे अध्यक्ष सातव यांनी सांगितले.बँकेच्या प्रगतीत उपाध्यक्ष विजयराव गालिंदे, तज्ञ संचालक सी.ए. प्रितम पहाडे , अॅड. श्री. शिरीष कुलकर्णी , संचालक श्री. रोहित घनवट,किशोर मेहता, देवेंद्र शिर्के, उध्दव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले,रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, नुपूर शहा, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. अमोल गोजे, अॅड, रमेश गानबोटे, शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक विनोद रावळ तसेच सर्व कर्मचारी वंद यांनी सक्रिय सहकार्य केल्याचे अध्यक्षांनी नमूद केले.
Baramati Cooperative Bank : बारामती बँकेला ७१ कोटींचा ढोबळ नफा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:03 IST