बारामती नगरपालिकेची धडक कारवाई सुरू
By Admin | Updated: March 15, 2017 03:24 IST2017-03-15T03:24:41+5:302017-03-15T03:24:41+5:30
बारामती नगरपालिकेने मिळकतधारकांकडून १०० टक्के करवसुलीसाठी कंबर कसली आहे. मिळकतधारकांची थकबाकी जाहीर करण्याबरोबरच अन्य कठोर कारवाई करण्यात येणार

बारामती नगरपालिकेची धडक कारवाई सुरू
बारामती : बारामती नगरपालिकेने मिळकतधारकांकडून १०० टक्के करवसुलीसाठी कंबर कसली आहे. मिळकतधारकांची थकबाकी जाहीर करण्याबरोबरच अन्य कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. करवसुलीसाठी मार्च महिन्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ११ कोटी करवसुलीसाठी आता जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने नगरपालिकांना १०० टक्के करवसुलीचे आदेश दिले आहेत. तरच शासकीय अनुदान मिळणार, असे सुचित केले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करवसुलीसाठी नगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. ११ कोटींपेक्षा अधिक करवसुली करण्याचे उद्दिष्ट नगरपालिकेचे आहे. करवसुलीसाठी मिळकतधारकांना नगरपालिकेने वेळोवेळी सुचित केले आहे. त्यामुळे रिक्षा भोंगाद्वारेदेखील आवाहन केले जात आहे.
टॉप १० थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध होणार...
थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतीसमोर हलगी वाद्य वाजविणे इत्याादी मार्गाचा अवलंब केला. तथापि, थकबाकीदार मिळकतधारकांकडून कर भरण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नगर परिषदेने वसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सर्व वसुली पथकांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये थकबाकीदारांवर कारवाईचे नियोजन केले. या दरम्याान सुरुवातीस प्रत्येक प्रभागातील दहा टॉप-१० थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सर्वच थकबाकीदारांची नावे वृत्तापत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी दोन पथके थकबाकीदारांचे नळजोडणी तोडून टाकणार आहे. नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडले आहे.