शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Baramati Lok Sabha Election 2024 :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती' ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर ; पाहा संपूर्ण तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 21:19 IST

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 :बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. ही लढत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशीच सुरू आहे, यामुळेच जोरदार चर्चा सुरू आहे. आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्तीविषयी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर स्थूल मूल्य हे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ एवढं आहे. 

राजेच ते, संपत्ती किती विचारायची नसते! उदयनराजेंनी स्वत:च जाहीर केली

बँकेतील ठेवी

सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञा पत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हातातील रोख रक्कम ३ लाख ३६ हजार ४५० रुपये एवढी आहे. बँकेत त्यांच्या नावे २ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपये आहे. तर पती अजित पवार यांची बँकेतील ठेवी २ कोटी २७ लाख ६४ हजार ४५७ रुपये एवढी आहे. 

सुनेत्रा पवार यांच्या नावावर बँकेत कर्जही आहे

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर १२ कोटी ११ लाख १२ हजार ३७४ रुपयांचे कर्ज आहे. अजित पवार यांच्या नावावरही कर्ज ४ कोटी ७४ लाख ३१ हजार २३९ रुपयांचं कर्ज आहे. 

शेअर्समधील गुंतवणूक

सुनेत्रा पवार यांनी शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या शेअर्समध्ये १५ लाख ७९ हजार ६१० रुपये एवढी रक्कम गुंतवली आहे.  बचत योजनांमध्ये ५६ लाख ७६ हजार ८७७ रुपये गुंतवले आहेत. ६ कोटी ५ लाख १८ हजार ११६ रुपयांचे व्याजाचे मूल्य आहे.

सोन्या-चांदीतही गुंतवणूक

सुनेत्रा पवारर यांच्याकडे ३४ लाख ३९ हजार ५६९ रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिणे आहेत. यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे. 

वाहनांचाही समावेश

सुनेत्रा पवार यांच्याकडे १० लाख ७० हजारांच्या किमतीच्या गाड्या आहेत. यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहे.

स्थावर मालमत्ता

सुनेत्रा पवार यांच्याकडे ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात शेतजमिन आणि बिगरशेतीच्या जमिनिचा समावेश आहे. सुनेत्रा पवारांच्या नावे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रुपयांची जंगम मालमत्ता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे १३ कोटी २५ लाख ६ हजार ०३३ रुपये एवढी आहे.

टॅग्स :baramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४