शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही', सुप्रिया सुळेंनी उलगडले अदाणी-पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:19 IST

अदाणी आणि पवार कुटुंबियांचे गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन ऋणानुबंध

बारामती : ‘गौतमभाई’ आणि ‘प्रीतीभाभी’ दोघेजण आवर्जुन अहमदाबादवरुन बारामतीला आले आहेत. गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही. अदाणी आणि पवार कुटुंबियांचे गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन ऋणानुबंध आहेत. गेली अनेक वर्ष गौतमभाई दिवाळीला दरवर्षी बारामतीला येतातच. खरंतर आपण तिथीनुसार आपण दिवाळी साजरी करतो. परंतु बारामतीची खरी दिवाळी आज सायन्स सेंटरच्या माध्यमातून साजरी होत आहे. त्यासाठी योगायोगाने गौतमभाई उपस्थित राहिले. बारामतीत चांगल काहीतरी घडतंय. म्हणुनच एवढे सायंटीस्ट या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, अशा शब्दात खासदार सुप्रिया  सुळे यांनी पवार कुटुंबाचे अदानी कुटुंबियांसमवेत असणारे ऋणानुबंध उलगडले.

तसेच पुरंदर —बारामतीच्या सीमेवर प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानींचा खासगी विमानतळ होणार असल्याची चर्चा आहे. सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनाच्या निमित्ताने अदानी यांनी आज सपत्नीक दिलेली भेट भुवया उंचावणारी ठरली. कार्यक्रमानंतर उद्योगपती अदानी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट देत स्नेहभोजन केले. सुमारे पाऊस तास अदानी पवार कुटुंबियांसमवेत होते. या पार्श्वभुमीवर एकुणच अदानी—बारामती बंध अधिक मजबूत होत असल्याचे संकेत आहेत.

एकीकडे केंद्रातील भाजपा सरकार उद्योजक अदानी यांना उद्योग क्षेत्रात झुकते माप देत असल्याची नेहमी चर्चा होते. या पार्श्वभुमीवर देशातील बडे उद्योजक गौतम अदानी यांची बारामती भेट औत्सुक्याचा विषय होती. आजच्या कार्यक्रमात अदानी यांना आयोजकांनी भाषणासाठी नाव पुकारत विनंती केली. मात्र, भाषण करणे त्यांनी टाळले. यावेळी दौऱ्यात अदानी यांची देखील उपस्थिती होती. यावेळी प्रीती अदानी यांना बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुंसह सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेल्या भाजीपाल्याची टोपली देखील देण्यात आली

उद्योगपती गौतम अदानीं आणि रोहित पवारांचा एकत्रित प्रवास

सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले उद्योगपती गौतम अदानी यांचे स्वागत करण्याची जबाबदारी आमदार रोहित पवार यांनी पार पाडली. यावेळी गौतम अदानी आणि रोहित पवार एका गाडीतून प्रवास केला. रोहित पवार यांनी स्वत: सारथ्य करीत गाडी चालवत अदानी यांना मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचवले.

टॅग्स :BaramatiबारामतीAdaniअदानीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेRohit Pawarरोहित पवार