बारामती, इंदापूरला डेंगीचा ‘ताप’ वाढतोय!

By Admin | Updated: September 7, 2016 01:34 IST2016-09-07T01:34:40+5:302016-09-07T01:34:40+5:30

बारामती एमआयडीसी चौक परिसरात व इंदापूरच्या जंक्शन परिसरात डेंगीचा ताप दिवसेंदिवस वाढतच आहे. सूर्यनगरीमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

Baramati, Indapur is increasing the temperature of the dengue! | बारामती, इंदापूरला डेंगीचा ‘ताप’ वाढतोय!

बारामती, इंदापूरला डेंगीचा ‘ताप’ वाढतोय!

बारामती : बारामती एमआयडीसी चौक परिसरात व इंदापूरच्या जंक्शन परिसरात डेंगीचा ताप दिवसेंदिवस वाढतच आहे. सूर्यनगरीमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
सूर्यनगरी परिसरात डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती याच भागात होत असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागातील उद्योजक, वैद्यकीय, मेडिकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांना या आजाराला
सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. एकाच घरात दोन रुग्ण आढळून येत आहेत. एमआयडीसी भागात झालेल्या पावसानंतर हे प्रमाण वाढले आहे.
सूर्यनगरी येथील डॉ. अमित गाढवे यांनी सांगितले, की सूर्यनगरी परिसरात डेंगी, चिकुनगुनिया, गोचिड तापसदृश आजारांचे प्रमाण अधिक आहे.
ताप, थंडी, सांधेदुखी, अंगावर लालसर व्रण उठणे आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय पाणी साठू न देण्याची दक्षता घ्यावी. (प्रतिनिधी)

Web Title: Baramati, Indapur is increasing the temperature of the dengue!