शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बारामती दूध संघाच्या वतीने खरेदी दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:15 IST

सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन

बारामती: बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.या दरवाढीतुन  दूध संघाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलासा दिला आहे.

सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूधाला तसेच दूध पावडर व बटर इत्यादीची मागणी वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या दूध दर वाढवून मिळत आहेत. त्यामुळे बारामती दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात रुपयांनी वाढ केली आहे. ११ फेब्रुवारी पासून बारामती दूध संघाचा ३.५/८.५ गुणप्रतसाठी गाय दूध खरेदी दर प्रति लीटर  रू.29 अधिक वाहतूक / कमिशन एवढा करण्यात आला आहे. सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन होत आहे. 

संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा सुविधा, आयुर्वेदिक उपचार पध्दत प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. तसेच दुध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर (स्वस्त दरात) विक्री केली जाते. संघाचे पॅकींग दूध ‘नंदन’ बॅडने विविध शहरांमध्ये विकले जात असून सदरचे दूध पुणे, नाशिक, शिर्डी, मालेगांव, मुंबई, रोहा, महाड, औरंगाबाद, नांदेड, लातूर, गुलबर्गा या विविध शहरात मध्ये विक्री होत आहे. विविध नामांकित कंपन्यांना त्यामध्ये मदर डेअरी दिल्ली, कॉफी डे, ताज हॉटेल, अँड हयात हॉटेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हिंदुजा हॉस्पीटल, बॅच कॅन्डी हॉस्पीटल, मंत्रालय, कोकण भवन इत्यादी ठिकाणी संघाचे नंदन दूधाची विक्री होत आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीmilkदूधFarmerशेतकरीcowगाय