बारामतीत आज वीज नाही
By Admin | Updated: October 15, 2015 00:57 IST2015-10-15T00:57:03+5:302015-10-15T00:57:03+5:30
तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बारामती शहराचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. १५) काही काळ बंद राहील, असे महावितरणने कळवले आहे.

बारामतीत आज वीज नाही
बारामती : तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बारामती शहराचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. १५) काही काळ बंद राहील, असे महावितरणने कळवले आहे.
शहरातील सहाही वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा साधारणत: सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बंद राहील. काम पूर्ण झाल्यास निर्धारित वेळेआधीही वीजपुरवठा सुरू होईल. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.