बारामती : वातावरणातील बदलामुळे बारामती शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच गर्दी दिसते. ग्रामीण भागात त्यातही जिरायती भागात संशयित डेंगी रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. आतापर्यंत बारामती शहर, तालुक्यात ७५ डेंगी संशयित रुग्ण आढळून आले आहेत. बारामती शहरात डेंगीमुळे दोन महिलांचा बळी गेला. शहरातील नव्या, जुन्या हद्दीत थंडी-तापाने त्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यासंदर्भात तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश जगताप यांनी सांगितले, की मागील आठ ते दहा दिवसांत विषाणूजन्य तापाने रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची वाढ झाली आहे. बाह्यरुग्ण तपासणीसाठी दररोज रुग्णांची गर्दी होत आहे. बहुतेक रुग्ण थंडी-तापाने त्रस्त आहेत.ग्रामीण भागात धूरफवारणीची गरज...४सरकारी दवाखाने, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबरोबरच शहरातील खासगी रुग्णालयात तापाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंध आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनानेदेखील धूरफवारणी सुरू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गाजरगवताचे निर्मूलनदेखील करणे आवश्यक आहे.बारामती शहरातदेखील कीटकशास्त्रीय सर्वेक्षण सुरू आहे. शहरातील सूर्यनगरी या भागात डेंगीसदृश रुग्णांची संख्या जास्त आहे. सूर्यनगरी, तांदूळवाडी, रुई या परिसरात जवळपास १६ रुग्ण डेंगीसदृश आढळून आले आहेत. येथील सुमन रेसिडेन्सी या इमारतीच्या परिसरात डेंगीला पोषक असलेल्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्या ठिकाणी रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. डास निर्मूलन फवारणीसारख्या उपाययोजना सुरू आहेत. परंतु, वातावरणातील बदल, सतत पावसाळी वातावरण याचाही परिणाम रक्त तपासणीचे नमुने एनआयव्हीकडे...नागरिकांच्या निवेदनानंतर बैठक...४नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. दोन महिलांचा बळी गेल्यानंतर आज अधिकारी, पदाधिकाºयांची बैठक नगरपालिकेत पार पडली. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाºयांना निवेदन दिले. त्यानंतर प्रशासन हलले.डेंगी रुग्णांसाठीस्वतंत्र विभाग...४डेंगीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग रुग्णालयात आहे. शहरातील खासगी रुग्णालयात दाखल होणाºया डेंगीच्या रुग्णांची दररोज माहिती घेण्यात येत आहे. आवश्यक औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयात उपलब्ध आहे, असे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बारामतीत दर गुरुवारी कोरडा दिवस पाळणार...नगरपालिकेने घेतलेल्या दर गुरुवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने घरातील पाणी साठविण्याच्या टाक्या, फ्रीज, कुलर, कुंड्या, टाकाऊ वस्तू, पत्र्याचे डबे, नारळाच्या करवंट्या, फुटक्या बाटल्या, डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात यावीत, यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करावे.स्वच्छतागृहाच्या पाइपला जाळ्या बसविणे, घरोघरी जाऊन डासापासून सर्वेक्षण होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे.डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे कोरडा दिवस पाळण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा तावरे, आरोग्य सभापती नीलिमा मलगुंडे, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले. या बैठकीला नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बारामतीला विषाणूजन्य आजारांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 06:38 IST