शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 20:18 IST

रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते...

बारामती: माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी (दि. ३१) भर सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार  केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता. 

जखमी अवस्थेतील तावरे यांना दादा जराड, मयुर भापकर, युवराज जेधे, आदेश डोंबाळे यांनी तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. 

रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. माळेगावातील राजकीय घडामोडींमध्ये रविराज यांची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे आज त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत वेगळीच चर्चा रंगत आहे. —————————————————....फायरिंगचा आवाज आलामाळेगाव कारखाना रस्त्यावरील झेलसिंग रस्त्यावर संभाजीनगर परिसर आहे. या ठिकाणी मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी रविराज तावरे हे त्यांच्या ऑडी कार (एमएच १२ —केइ १८००) मधुन वडा पाव घेण्यासाठी आले. वडापाव घेवुन त्याचे पैसे देऊन गाडीत बसत होते. यावेळी दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी ‘फायरींग’चा आवाज आला.मात्र, येथील मुलांनी गाडीचा टायर फुटला असल्याचे समजुन दुर्लक्ष केले. मात्र, तावरे यांच्या पत्नी ओरडल्याने मुलांसह ग्रामस्थांनी धाव घेतली..

टॅग्स :BaramatiबारामतीFiringगोळीबारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी