शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

बारामतीत सलग ४ दिवस धुवाधार, शहर, बागायती भागात सरासरी ओलांडली, जिरायती भाग मात्र कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:19 IST

बारामती शहराला सलग चार दिवस जोरदार पावसाने झोडपले आहे. दिवसभराचा उकाडा, रखरखीत उन्हाचे चटके घेतल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावणे, हा दिनक्रम मागील चार दिवसांपासून बारामतीकर अनुभवत आहे.

 बारामती : बारामती शहराला सलग चार दिवस जोरदार पावसाने झोडपले आहे. दिवसभराचा उकाडा, रखरखीत उन्हाचे चटके घेतल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावणे, हा दिनक्रम मागील चार दिवसांपासून बारामतीकर अनुभवत आहे.तालुक्यातील जिरायती भागाच्या पट्ट्यात मागील आठवड्यात पाऊस पडला. त्यानंतर मात्र, पावसाने दडी मारली आहे. परंतु, शहर, बागायती भागात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. पर्जन्यमापन केंद्र निहाय साधारणत: ५१५ ते ५२६ मिमी इतका पाऊस आज तागायत पडला आहे. काल सोनगावच्या परिसरात एकाच दिवसात १०५ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, जिरायती भागातील सोनवडी सुपे, अंजनगाव, मोरगाव, जळगाव कडेपठार, सुपे या परिसरात आणखी दमदार पावसाची गरज आहे. परंतु, बारामती परिसरातील नागरिकांनी या सततच्या पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसाने धरणाचा पाणीसाठा वाढला. त्याचा देखील दिलासा बारामतीकरांना आहे.बारामती पुन्हा तुंबली...आज सायंकाळी पुन्हा बारामती परिसरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून जोरदार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. वादळी वाºयासह सायंकाळी सुरू झालेला पाऊस थांबतच नव्हता. बारामती शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले.सर्वदूर पाऊसइंदापूर तालुक्यात मात्र सर्वदूर पाऊस झाला आहे. तालुक्यातील बहुतेक भागातील ओढे-नाले तुडुंब भरले आहेत, तर नीरा व भीमा नदीला पाणी सोडले आहे.द्राक्ष, डाळिंब, केळीसाठी हानीकारकशेतक-यांनी नुकत्याच उसाच्या लागवडी केल्या आहेत. शहरालगतच्या पिंपळी, गुणवडी, लिमटेक, काटेवाडीसह माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नव्याने झालेल्या उसाच्या लागवडी पावसाच्या पाण्याने भरून गेल्या आहेत. सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत आहे. खरीपाच्या बाजरी, मका व ऊस,कडधान्याला पोषक वातावरण असले तरी द्राक्ष,डाळिंब,केळी सारख्या अगदी पिकाला हा पाऊस नुकसान कारक ठरल्याचे दिसत आहे. सध्या द्राक्षबागा मणी धरण्याच्या अवस्थेत आहे.काही ठिकाणी छाटण्या झाल्या आहेत.या पावसामुळे मण्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. डाळिंबाच्या बागांवर फळकूज,कुजवा व इतर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्ता वाढू लागली आहे. खरीप केंद्राच्या लागवडीवर पावसाचा दुष्परिणाम झाल्याचे जाणवत आहे. अश्या पावसाने कांद्याची उगवण ४० टक्क्यांनी कमी होते. बियाणे व छतावर झालेला खर्च वाया जातो.केळीच्या लागवडीला ही पावसामुळे अडचण निर्माण झाली आहे.पाणी जाण्यासाठी सोयच केली नसल्याचे उघडरस्ते विकास महामंडळाने चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या क-हानदीच्या पुलावर पावसाचे पाणी वाहून जाण्याची सोयच नाही. गेल्या पाच वर्षात नगरपालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही उताराला साठलेल्या पाण्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या आज देखील बंद पडण्याचे प्रकार घडले. भूमिगत गटार यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. सलग चार दिवस घराघरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. नगरपालिका प्रशासन पावसाच्या साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यात अयशस्वी ठरली आहे. गटाराचे पाणी कºहानदीत सोडणाºया नगरपालिका प्रशासनाने पावसाचे पाणी कºहानदीत सोडण्यात कोणतीही उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडत असल्याचे चित्र आहे.जिरायती भाग मात्र अद्यापही प्रतीक्षेतमोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावात गेल्या आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे या भागातील रब्बी हंगामाला उपयुक्त पाऊस आहे. परंतु, दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. मोरगाव परिसरातील कºहा नदीचे पात्र कोरडेच आहे. त्याचबरोबर ओढे, पाझर तलाव, विहिरी कोरड्या आहेत. बारामती, इंदापूरच्या नीरा खोºयात धरणाचे पाणी नीरा नदीत सोडल्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील सोनेश्वर येथील नीरा-कºहाचा संगम तसेच इंदापूर तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथील नीरा-भीमा नदीवरील संगामावरील पाण्याचे पात्र विस्तीर्ण झाले आहे.बारामतीतील पाऊस१ जून ते १३ सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण- बुधवार दि. १३ सप्टेंबर २०१७ पर्जन्यमान : बारामती ४० (एकूण - ५२६), लाटे ३१ (एकूण - ३२५), सुपे ३१ (एकूण - ३३५), लोणी भापकर - ४२ (एकूण ४६४), बºहाणपूर ३५ (एकूण ४३८), सोमेश्वर कारखाना ४३ (एकूण - २४६), पणदरे - ५५ (एकूण ४३२), जळगाव कडेपठार २७ (एकूण ४४६), वडगाव निंबाळकर - २५ (एकूण २९७), मोरगाव १७ (एकूण २८६), ८ फाटा होळ १३.८ (एकूण ३३२.३), उंडवडी कडेपठार १९ (एकूण १३२), माळेगाव कारखाना ४५ (एकूण-२४७), माळेगाव कॉलनी ९६ (एकूण ४३४), मानाजीनगर ३४ (एकूण ३७१), चांदगुडेवाडी ४४ (एकूण ४८४), काटेवाडी ३५ (एकूण ३९०), सोनगाव १०५.६ (एकूण ५८९.१), के.व्ही.के १०४.४ (एकूण ५१५), कटफळ ३१, अंजनगाव ३०, सोनवडी सुपे ३२.

टॅग्स :Puneपुणे