Baramati Bank Election Result: नाट्यमय घडामोडीनंतर बारामती सहकारी बँक निवडणूक अखेर बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:59 PM2021-12-08T21:59:48+5:302021-12-08T21:59:59+5:30

Baramati Bank Election Result: बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.

Baramati Co-operative Bank election finally unopposed after dramatic events | Baramati Bank Election Result: नाट्यमय घडामोडीनंतर बारामती सहकारी बँक निवडणूक अखेर बिनविरोध

Baramati Bank Election Result: नाट्यमय घडामोडीनंतर बारामती सहकारी बँक निवडणूक अखेर बिनविरोध

googlenewsNext

बारामती :  येथील बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज  माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व अर्ज माघारी घेण्यात आल्याने निवडणुक बिनविरोध झाली आहे.शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज  शिल्लक राहिले होते. ते माघारी घेण्यात नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरली आहे.

१५ जागांपैकि दोन जागा बिनविरोध करण्यात यापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संबंधितांशी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली. काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. विजय भिसे यांनी खुल्या प्रवर्गा सह अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये आपला अर्ज कायम ठेवला होता. तसेच त्यांची कन्या डॉ. प्रतीक्षा भिसे यांचा अर्ज देखील महिला प्रवर्गात  राहिला होता.  त्यामुळे बारामती सहकारी बँकेच्या  निवडणूकीची १३ जागांसाठी लढत  होणार असल्याची चर्चा सुरु होती.मात्र, डॉ भिसे यांच्यासह त्यांच्या कन्येचा अर्ज शेवटच्या क्षणी  माघारी घेतल्याने निवडणुक बिनविरोेध करण्यात यश आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे उमेदवार रोहित घनवट हे इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून तर उद्धव गावडे यांचा  भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.  डॉ. विजय भिसे यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला.त्यामुळे निवडणुक बिनविरोध झाली आहे.

पुणे विभागातील सर्वात मोठी मल्टी शेड्युल्ड बॅंक असलेल्या बारामती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास अखेर  राष्ट्रवादी काॅंग्रेसला यश आले.  राष्ट्रवादीने मंगळवारीच सहकार प्रगती पॅनेल जाहीर केला होता. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप आदींनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी  मोलाची भूमिका बजावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचे कामकाज चालते.
 

बिनविरोध झालेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे 

     क्रियाशील सभासदांचा सर्वसाधारण मतदार संघ

•    सतिन सदाशिवराव सातव •    मंदार श्रीकांत सिकची •    रणजित वसंतराव धुमाळ •    जयंत विनायकराव किकले •    नुपूर आदेश शहा वडूजकर •    देवेंद्र रामचंद्र शिर्के •    डॉ. सौरभ राजेंद्र मुथा •    किशोर शंकर मेहता •    अँड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी •    नामदेवराव निवृत्ती तुपे

महिला राखीव प्रतिनिधी

•    कल्पना प्रदीप शिंदे •    वंदना उमेश पोतेकर

भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग

•    उध्दव सोपानराव गावडे इतर मागासवर्ग प्रतिनिधी

•    रोहित वसंतराव घनवट

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी

•    विजय प्रभाकर गालिंदे 
 

Web Title: Baramati Co-operative Bank election finally unopposed after dramatic events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.