बारामतीत ‘चिल्लर’चा गोंधळ!
By Admin | Updated: September 27, 2014 07:24 IST2014-09-27T07:24:32+5:302014-09-27T07:24:32+5:30
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चित्रपटातील नायक चिल्लर घेऊन येतो

बारामतीत ‘चिल्लर’चा गोंधळ!
बारामती : ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चित्रपटातील नायक चिल्लर घेऊन येतो. त्यामुळे चिल्लर मोजताना कर्मचारी घामाघूम होतात. तसाच किस्सा आज बारामती विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने केला. १० हजार रुपये अनामत रक्कम भरण्यासाठी त्याने ९ हजार रुपयांची चिल्लर व १० रुपयांच्या १00 नोटा सादर केल्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून पिशवीत नाण्यांची चिल्लर आणली. ही चिल्लर मोजण्यासाठी ४ ते ५ कर्मचारी कामाला लागले. माळेगाव ग्रामस्थांनी ही नाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिली, असा त्याने केला. परंतु, आज दुपारी निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये देखील ‘चिल्लर’मुळे चर्चेचा विषय झाला. त्याने १०, ५, २ व १ रुपयांची नाणी अनामत रक्कम म्हणून आणली होती. १ हजार रुपयांच्या नोटा दिल्या, त्याही १० रुपयांच्या होत्या.