शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांचा फोन आल्यानंतर निर्णय बदलला; बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:39 IST

Baramati Bypoll Election सहानुभूतीची लाट असली तरी ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून, ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि किरण गुजर यांनी केलेल्या चर्चेनंतर हाके यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. या घडामोडीत भरणे यांची शिष्टाई यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांना आपुलकीने जोडणारा नेता हरपल्याने त्यांच्या स्मरणार्थ प्रा. हाके यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने हाके यांच्याशी संवाद साधून त्यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली होती, जी त्यांनी मान्य केली.

दरम्यान, प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, सहानुभूतीची लाट असली तरी ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांचे फोन आले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचा फोन आल्यानंतर निर्णय बदलण्याचा विचार केला.

माघार घेत असताना हाके यांनी आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. ‘ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी माझा लढा सुरूच राहणार आहे. निवडणूक संपल्यानंतर मी माझ्या मागण्या सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जाहीर केलेल्या १८ महामंडळांना अद्याप अध्यक्ष नेमले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ‘निवडणूक १५ दिवसांची असली तरी आमचा लढा कायम राहणार आहे. आम्ही थांबणार नाही,’ असा इशाराही हाके यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Laxman Hake withdraws after Sunetra Pawar's call.

Web Summary : OBC leader Laxman Hake withdrew from Baramati bypoll after discussions initiated by Sunetra Pawar. Hake will continue advocating for OBC issues, presenting demands to state leaders post-election. He highlighted pending appointments to OBC corporations.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीlaxman hakeलक्ष्मण हाकेPoliticsराजकारणSunetra Pawarसुनेत्रा पवारOBCअन्य मागासवर्गीय जातीMahayutiमहायुती