शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बारामती : आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जमीनीचे बेकायदा अधिग्रहण केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:04 IST

प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले....

बारामती (पुणे) : मेडद (ता. बारामती) येथील नियोजित आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे गट नंबर ४०१—१ या जागेत काम सध्या सुरु आहे. त्यासाठी शासनाची गायरान जमीन ५.८७ हेक्टर जमीन अधिग्रहित केली आहे. तसेच मात्र, या कामासाठी गट क्रमांक ४१४—२ मधील २०७ जणांच्या  ७/१२ वरील आमच्या हक्काच्या नावाच्या नोंदी रद्द करून आयुर्वेदिक कॉलेजची नोंद बेकायदेशीर पणे करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार बेकायदेशीर असल्याची तक्रार मेडद म्हाडा प्लॉटधारक कृती समितीच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या वतीने गुरुवारी (दि १०) प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याबाबत समितीचे अध्यक्ष आनंद धोंगडे यांनी सांगितले की, या महाविद्यालयासाठी ५ एकर क्षेत्राची गरज असताना जिल्हाधिकारी यांनी तीन पट म्हणजेच क्षेत्र १५ एकर अधिग्रहीत केली आहे. या जागेवर आयुर्वेदिक कॉलेज करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतू आमच्यावर अन्याय करून सदर जागेच्या लगत असलेल्या आमच्या मालकीच्या जागेतून आम्हाला हुकुमशाही पद्धतीने बाहेर काढण्याचा राजकीय दबाव वापरून प्रयत्न चालू आहे. बारामतीतील प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी आम्हाला कल्पना न देता ७/१२ वरील आमच्या हक्काच्या नावाच्या नोंदी रद्द करून आयुर्वेदिक कॉलेजची नोंद बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे धोंगडे यांनी सांगितले.

गट नंबर ४१४—२ मधील जागा म्हाडा पुणे यांच्या नावावर होती. त्यानंतर २०७७ ते २०१४ सालात कायदेशीर नोंदणीशुल्क भरुन कायम खुश खरेदी खताने आम्ही जवळपास २०७ जणांनी खरेदीखत करुन विकत घेतली आहे. आमच्या नावावर म्हाडा प्राधिकरणाने या जागेची ताबा पावती दिली आहे. ही जागा आमच्या वाहिवाटीत आहे. अजून आम्ही कुणालाही खरेदीखत करुन अगर कायदेशीर विक्री करुन ताबा दिलेला नाही. म्हाडा प्राधिकरणाने आमच्याकडून खरेदीखत पलटवून जागेचा ताबा कायदेशीर मार्गाने परत घेतला नाही. तसेच सह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीचा व्यवहार म्हाडा प्राधिकरणाकडून झालेला नाही. त्यामुळे जागेची मालकी व ताबा पूर्णपणे आमच्या ताब्यात असल्याचा दावा धोंगडे यांनी केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीhospitalहॉस्पिटल