बारामती ७0, लाला बँकेसाठी ३५ टक्के मतदान

By Admin | Updated: March 9, 2015 00:44 IST2015-03-09T00:44:49+5:302015-03-09T00:44:49+5:30

लाला अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ८,३०५ मतदारांपैकी २,९२५ मतदारांनी रविवार (दि. ८) मतदानाचा हक्क बजाविला

Baramati 70, 35 percent polling for Lala Bank | बारामती ७0, लाला बँकेसाठी ३५ टक्के मतदान

बारामती ७0, लाला बँकेसाठी ३५ टक्के मतदान

नारायणगाव : लाला अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ८,३०५ मतदारांपैकी २,९२५ मतदारांनी रविवार (दि. ८) मतदानाचा हक्क बजाविला. सरासरी ३५.२३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खंबायत यांनी दिली.
या निवडणुकीत १३ जागांसाठी २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. नारायणगाव येथे ७२२ मतदान, मंचर येथे १००१ मतदान, आळेफाटा येथे ४३५ मतदान, खेड येथे ४८१ मतदान, भोसरी येथे २८७ अशा पाच मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सांय. ५ वाजेपर्यंत मतदान झाले.
या निवडणुकीत ज्येष्ठ सभासदांनी विशेषत: आदिवासी भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
काही सभासदांची नावे मतदान केंद्रावरील मतदार यादीत आढळून न आल्याने, तसेच तांत्रिक कारणांमुळे मतदान करता आले नाही.
काही नावे दुसऱ्या मतदान केंद्रावर असल्याने सभासदांनी मतदान केले नाही. त्यामुळे सभासदांनी नाराजी व्यक्त केली.
या निवडणुकीत
विद्यमान संचालक मंडळातील विद्यमान अध्यक्ष अशोक गांधी, उपाध्यक्ष दीपक खैरे, तात्यासाहेब गुंजाळ, निवृत्ती काळे, प्रल्हाद बाणखेले, जगदीश फुलसुंदर, मनसुखलाल भंडारी, धोंडिभाऊ घंगाळे, विमल थोरात; तर नवीन उमेदवार सचिन कांकरिया, नारायण गाढवे, मथुराबाई बाणखेले, मधुकर लोणारी, सुनीता साकोरे आदींचे भवितव्य उद्या सोमवार दि. ९ दुपारपर्यंत कळणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Baramati 70, 35 percent polling for Lala Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.