शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ऐन दिवाळीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ! स्वीट होममध्ये आढळला ५० किलो भेसळयुक्त खवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 18:49 IST

या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे

बारामती: दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर ठेपली असताना बारामती शहरात अन्न औषध प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील एका स्वीट होमवर अचानक छापा टाकत भेसळयुक्त  खवा  जप्त केला आहे. हिंद स्वीट्स असे या दुकानाचे नाव आहे. भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या या दुकानात ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आला. शनिवारी(दि ३०) दुपारी ही कारवाई करण्यात केली. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याचे अधिकारी राहुल खंडागळे यांनी या संदर्भात माहिती दिली.

या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. एकूण किलो खवा येथे आढळला आहे. पथकाला हा खवा पुरवणाऱ्या पुरवठादारांची नावे निष्पन्न झाली आहेत. हा खवा जप्त करण्यात आला आहे. मात्र त्या संदभार्तील नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल येण्यास २० दिवसांचा कालावधी लागेल, असे अन्न सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे यांनी सांगितले.

दुकानाचा परवाना नसल्याने हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दुकानदाराने बाहेरून खवा मागवला होता. त्यामुळे यामध्ये ज्यांच्याकडून या खव्याचा पुरवठा झालेला आहे, अशा पुरवठादारांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानात उत्पादक म्हणून नव्हे, तर या दुकानाने हा खवा येथे विक्रीसाठी ठेवला होता. मात्र या दुकानाकडे अन्नपदार्थ विकण्याचा परवाना नसल्याने या दुकानात बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे खंडागळे यांनी सांगितले. घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरु होते. अन्न व औषध प्रशासनाने दोन  पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली.

दरम्यान, दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणामुळे बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. त्यातच तयार फराळांना मागणी वाढत आहे. मात्र, आज झालेल्या कारवाईमुळे  काही ठिकाणी होणारा काळा बाजार उघड झाला आहे. कारवाईच झाली नसती, तर भेसळयुक्त खव्याची विक्री होण्याचा धोका होता. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा धोका टळला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागbaramati-acबारामतीCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे