बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

By Admin | Updated: January 10, 2017 03:50 IST2017-01-10T03:50:35+5:302017-01-10T03:50:35+5:30

वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचा २०१७-१८चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Bar Association's election manifesto | बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचा २०१७-१८चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत असून ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५़३० या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ वाय. जी. ऊर्फ आबासाहेब शिंदे आणि मुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅड़ एकनाथ सुगावकर यांनी दिली.
अ‍ॅड़ प्रवीण नलावडे, अ‍ॅड़ संजय दळवी, अ‍ॅड़ शिरीष शिंदे सहनिवडणूक अधिकारी आहेत. तर, अ‍ॅड़ अमरसिंह पाटील, अ‍ॅड़ यशवंत खराडे, अ‍ॅड़ ज्ञानेश्वर बर्डे, अ‍ॅड़ प्रताप मोरे, अ‍ॅड़ स्मिता देशमुख आणि अ‍ॅड़ माधवी परदेशी या सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
उमेदवारी नामांकन फॉर्म विक्री येत्या मंगळवारपर्यंत (दि. १० जानेवारी) होणार आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंतच शिवाजीनगर न्यायालयातील पुणे बार असोसिएशनच्या आॅफिसात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
बुधवारी (दि. ११) पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात अर्जांची छाननी होईल. गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५़३० पर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहे. त्याच दिवशी म्हणजे गुरुवारीच सायंकाळी ६़३० वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Bar Association's election manifesto