‘ज्ञानगंगा’च्या बाप्पाचे शाळेच्या मैदानातच विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:59+5:302021-09-19T04:10:59+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीत सलग दुसऱ्या वर्षी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने इंद्रायणी नदीत गणेश विसर्जनास मनाई केली आहे. प्रत्येकाने आपापल्या घरी ...

‘ज्ञानगंगा’च्या बाप्पाचे शाळेच्या मैदानातच विसर्जन
तीर्थक्षेत्र आळंदीत सलग दुसऱ्या वर्षी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने इंद्रायणी नदीत गणेश विसर्जनास मनाई केली आहे. प्रत्येकाने आपापल्या घरी लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलने मिरवणूक न काढता शाळेतील आवारातच मोठ्या पातेल्यामधील पाण्यात गणपतीचे विसर्जन केले. शाळेच्या या उपक्रमाने इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
याप्रसंगी ज्ञानगंगा स्कूलचे मुख्याध्यापक विजय रामचंद्र गुळवे, उपमुख्याध्यापिका वैष्णवी विजय गुळवे, सुप्रिया पाटील, नीता करसाळे, अनुजा वळसे, शुभांगी मांडके, प्रियांका बाबर, श्वेता बोडके, संचिता भुजाडी, प्रभाकर बोधने, पूर्वा बाविस्कर उपस्थित होते. गावातील अनेकांनी शाळेच्या उपक्रमाचे अनुकरण करून गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन अध्यक्ष विजय गुळवे यांनी केले.
१८ आळंदी
ज्ञानगंगा स्कूलच्या गणपतीचे शाळेच्या मैदानातच विसर्जन करताना मान्यवर.