शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

 आठव्या चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रिंगण’ आणि ‘बापजन्म’ची बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 6:57 PM

मराठी चित्रपट परिवार आणि सहाया इव्हेट्सतर्फे आयोजित ८ व्या चित्र पदार्पण पुरस्कारामध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ आणि मकरंद माने दिग्दर्शित ‘ रिंगण’ या चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांमध्ये पारितोषिके मिळवित पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. 

ठळक मुद्देमराठी चित्रपट परिवार आणि सहाया इव्हेट्सतर्फे आयोजित आठवा चित्रपदार्पण पुरस्कार सोहळानिपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक

पुणे :  मराठी चित्रपट परिवार आणि सहाया इव्हेट्सतर्फे आयोजित ८ व्या चित्र पदार्पण पुरस्कारामध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ आणि मकरंद माने दिग्दर्शित ‘ रिंगण’ या चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांमध्ये पारितोषिके मिळवित पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. या कार्यक्रमात आॅस्कर अ‍ॅकॅडमीचे सदस्य उज्वल निरगुडकर,चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फिल्म फेडरेशनचे आॅफ इंडियाचे संचालक विकास पाटील, निर्माते अनिल काकडे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, सुजय डहाके, लेखक श्रीनिवास भणगे ज्येष्ठ चित्रकार रविमुकुल, दिग्दर्शक मनोज कदम, प्रसाद नामजोशी, गीतकार वैभव जोशी, संगीतकार अजय नाईक, निर्मात्या भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे  वितरण करण्यात आले.'बापजन्म' चित्रपटासाठी निपुण धर्माधिकारी आणि 'मुरांबा' चित्रपटासाठी वरुण नार्वेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. ती सध्या काय करते या चित्रपटातील अभिनय बेर्डे आणि घुमा चित्रपटासाठी शरद जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस विभागून देण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान ती सध्या काय करते मधील आर्या आंबेकर आणि भिकारी चित्रपटातील  ऋचा इनामदार यांनी पटकाविला. बापजन्म चित्रपटातील भूमिकेसाठी पुष्कराज चिरपुटकर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता ठरला. तर बघतोस काय मुजरा कर चित्रपटासाठी रसिका सुनील आणि ती सध्या काय करते चित्रपटासाठी र्ईशा फडके यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. घाट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा, मुरांबा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, घुमा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादाची पारितोषिके मिळाली. ती सद्या काय करते चित्रपटासाठी मंदार फडके यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार तर बापजन्म चित्रपटासाठी जयदीप वैद्य आणि दिप्ती माटे यांनी सर्वोत्कृष्ट गायक आणि गायिकेचा मान मिळविला. अदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे