शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांमध्ये विश्वासार्हतेसोबत सुरक्षितता देखील महत्त्वाची : अनिल कवडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 12:43 IST

बँकिंगसह सर्वच क्षेत्रात आज कमविण्यापेक्षा सांभाळणे हे महत्त्वाचे

ठळक मुद्दे हॅकिंगसारख्या विचित्र गोष्टींमुळे अनेक अडचणी समोर काही अघटित घटनांमुळे सहकार चळवळीला गालबोट पुणे जिल्ह्यातील ५० हून अधिक बँकांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

पुणे : बँकिंग क्षेत्रात सेवा देताना ग्राहकांना अचूकता, पारदर्शकता आणि वेग या गोष्टी आवश्यक असतात. त्याकरिता काळानुसार बँकिंगमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला. तंत्रज्ञानामुळे व्यवहार आणि सेवांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हॅकिंगसारख्या विचित्र गोष्टींमुळे अनेक अडचणी समोर आल्या. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पारदर्शकतेकरिता काही गोष्टी सांगितल्या. त्यांचा अवलंब करण्याबरोबरच बँकांमध्ये विश्वासार्हतेसोबत सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती करण्याकरिता तसेच बँकांच्या सुरक्षा यंत्रणा बळकटीकरणाविषयी परिषदेचे आयोजन सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, उपनिबंधक दिग्विजय राठोड, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगिता कांकरिया, संचालक सुनील रुकारी, डॉ. अशोक शिलवंत, नीलेश ढमढेरे, मंगला भोजने, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, विनायक तांबे, अ‍ॅड. अमित निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे उपस्थित होते. अनिल कवडे म्हणाले, काही अघटित घटनांमुळे सहकार चळवळीला गालबोट लागले. त्यामुळे सायबर सिक्युरिटीसारख्या विषयावर प्रशिक्षण उपक्रम राबविणे, हे आवश्यक आहे. बँकांसाठी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीप्रमाणेच चांगली मूल्ये व व्यवहारांमधील नैतिकतेचे संवर्धन होणे गरजेचे आहे.   विद्याधर अनास्कर म्हणाले, बँकिंगसह सर्वच क्षेत्रात आज कमविण्यापेक्षा सांभाळणे हे महत्त्वाचे झाले आहे. नफा कमविण्यापेक्षा नीट सांभाळण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. आज बँकिंग क्षेत्रात ‘सायबर सिक्युरिटी’ हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांतील सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने डिसेंबर २०१९ मध्ये सविस्तर सूचना दिल्या आहेत. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. साहेबराव टकले यांनी आभार मानले. 

फोटो ओळ :  पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती करण्याकरिता तसेच बँकांच्या सुरक्षा यंत्रणा बळकटीकरणाविषयी परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना (डावीकडून) नारायण आघाव, दिग्विजय राठोड, विद्याधर अनास्कर, अ‍ॅड. साहेबराव टकले, अनिल कवडे, अ‍ॅड. सुभाष मोहिते, संगीता कांकरिया.

टॅग्स :Puneपुणेbankबँकfraudधोकेबाजी