शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापकानेच घातला ३० लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 16:40 IST

कोंढवा शाखेतील बँकेच्या व्यवस्थापकाने इतर अधिकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून तब्बल ३० लाख ९३ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ 

ठळक मुद्देसजग महिला अधिकाऱ्यामुळे प्रकार उघडकीस

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोंढवा शाखेतील व्यवस्थापकाने इतर अधिकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून तब्बल ३० लाख ९३ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शालिवाहन मुकुंद सोलेगावकर असे या शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे़. याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे विभागीय अधिकारी संजीव नारखेडे (वय ५९, रा़ कोथरुड) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील महाराष्ट्र बँकेत हा प्रकार १७ जानेवारी ते १० मे २०१८ दरम्यान घडला़. सोलेगावकर हे बँकेचे जुने अधिकारी असून कोंढवा येथे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत होते़. त्यांनी बँकींग ट्रान्झेक्शन व इव्हीव्हीएसचे काम करत होते़. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन शाखेतील दोन अधिकाऱ्यांचा पासवर्ड वापरुन एकूण ७४ इंन्ट्रीजद्वारे इन्टरेस्टे पेड आॅन टर्म डिपॉझिट खात्यातून ३० लाख ९३ हजार ५०० रुपये एका व्यक्तीच्या खात्यात परस्पर हस्तांतरीत केले़. या ३० लाख रुपयांपैकी २२ लाख एका खात्यात तर स्वत:च्या अन्य दोन खात्यात ६ लाख ६० हजार हस्तांतरीत केले़. त्यापैकी २२ लाख रुपये त्यांनी वेळोवेळी एटीएमद्वारे काढले़. कोंढवा शाखेतील एक महिला अधिकारी यांना आपण न केलेल्या एन्ट्रीज आपल्या नावावर दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यांनी ही बाब शाखा व्यवस्थापक सोलेगावकर यांना सांगितली़. तेव्हा त्यांनी मी पाहून घेतो, तुम्ही काळजी करु नका असे उत्तर दिले़. त्याने त्याचे समाधान न झाल्याने या महिला अधिकाऱ्यांनी विभागीय अधिकारी संजीव नारखेडे यांना याची माहिती दिली़. त्यानंतर नारखेडे यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला़. सोलेगावकर यांना बँकेने निलंबित केले असल्याचे पोलिसांनी सांगितले़. पोलीस उपनिरीक्षक के़ के़ कांबळे अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :KondhvaकोंढवाbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिस