शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत बँकेचे एटीएम व दुकाने फोडणारे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 16:54 IST

सर्व चोऱ्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद

ठळक मुद्देआरोपींची कसून चौकशी केल्यावर दिली गुन्ह्याची कबुली

वडगाव कांदळी: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे तीन अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशिन व इतर चार दुकाने फोडली होती. आळेफाटा पोलिसांनी तपास करुन दोघा जणांना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. आळेफाटा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी पिंपळवंडी येथील बँक आँफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळे या चोरट्यांच्या हाताला काही लागले नव्हते. त्यानंतर त्यांनी पिंपळवंडी स्टॅन्ड येथील लक्ष्मी खानावळ या हाॅटेलच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. हाॅटेलमधील किरकोळ चिल्लर व शितपेयाच्या बाटल्या चोरी केल्या होत्या. त्यानंतर कार्यालय आणि मोटार वायंडिंग, किराणा मालाच्या दुकाने या सर्वांची कुलूप तोडून त्याठिकाणीही चोरी केली. त्यामध्ये किरकोळ वस्तू आणि काही रक्कम चोरीला गेल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाले होते. या फुटेजच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी तपास करुन राजेंद्र जाधव व कैलास काळे ( दोघेही रा.गुरेवाडी,) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या घटनेमधील एक आरोपी संतोष उर्फ विजय जाधव फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिस नाईक निलकंठ कारखेले आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आळेफाटा पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसात या घटनेचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल आळेफाटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Puneपुणेjunnarजुन्नरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी