बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी तरुणीला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST2021-03-27T04:12:07+5:302021-03-27T04:12:07+5:30

पुणे : गेल्या आठ वर्षांपासून कायदेशीर वैध पासपोर्ट, व्हिसा आणि शासनाची परवानगी न घेता देशात बेकायदा वास्तव्य करीत असलेल्या ...

A Bangladeshi girl living illegally has been remanded in custody | बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी तरुणीला कोठडी

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी तरुणीला कोठडी

पुणे : गेल्या आठ वर्षांपासून कायदेशीर वैध पासपोर्ट, व्हिसा आणि शासनाची परवानगी न घेता देशात बेकायदा वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशच्या २८ वर्षीय तरुणीस फरासखाना पोलिसांनी अटक केली.

जेबा ऊर्फ परवीन बेगम सैदउल्ला मियॉ (सध्या रा. कात्रज, मूळ रा. ग्राम बाबरा, ठाणा कालीगंज, जिल्हा झिनेदा, बांग्लादेश) असे तिचे नाव आहे. तिला न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा हवालदार राजश्री मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. २८ जानेवारीला रात्री ८.३० च्या सुमारास बुधवार पेठ परिसरात हा प्रकार उघडकीस आला. भारतात तिने कशा प्रकारे प्रवेश केला, तिला कोणी फूस लावून आणले आहेत का तसेच तिचे अन्य कोणी बांग्लादेशी साथीदार आहेत का? याचा तपास करायचा असल्याने तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title: A Bangladeshi girl living illegally has been remanded in custody