बांदल यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST2021-05-28T04:09:53+5:302021-05-28T04:09:53+5:30

येथील फिर्यादी तथा बांदल यांचे मित्र दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या येथील बाजारपेठेतील २ व्यापारी गाळ्यांचे कुलमुखत्यारपत्र करुन त्याचेवर शिवाजीराव ...

Bandal to judicial custody | बांदल यांना न्यायालयीन कोठडी

बांदल यांना न्यायालयीन कोठडी

येथील फिर्यादी तथा बांदल यांचे मित्र दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या येथील बाजारपेठेतील २ व्यापारी गाळ्यांचे कुलमुखत्यारपत्र करुन त्याचेवर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढून त्यांची बांदल यांचेसह वरील इतरानी फसवणूक केली असल्याची फिर्यादीवरुन बांदल यांचेसह इतर तिघांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले व बुधवारी दुपारी बांदल यांची अटक शिक्रापूरात झाली. दरम्यान मागील आठवड्यात पाणीचोरीच्या गुन्ह्यात बांदल यांचेवर एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामिन मंजूर करुन आणून ते शिक्रापूर पोलीसांपुढे हजर झाले असतानाच त्यांना मांढरे यांच्या तक्रारीवरुन दूसऱ्या गुन्ह्यात अटक झाली होती. आज त्यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Web Title: Bandal to judicial custody