शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खडकी मध्ये रात्री आठ नंतरही सुरु हॅाटेल, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 19:18 IST

खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमांची पायमल्ली, रात्री उशिरापर्यंत पथारीवाल्यांच्या गाड्या सुरु

ठळक मुद्देठाण्याच्या हददीत असूनही पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

खडकी बाजार: पुणे शहरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. आता आठ नंतर जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काही दुकाने हातगाड्या, हॉटेल्स सर्रासपणे सुरू आहे. त्यावर बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तर या गोष्टींकडे खडकी पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

 कोरोनाचा हाहाकार सर्वत्र सुरू आहे. शासनातर्फे कोरोना नियंत्रणात यावा याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहे. रात्रीची संचारबंदी असतानाही  रात्री अकरा साडेअकरा वाजेपर्यंत खडकी बाजार येथील हॉटेल क्राऊन सुरू असते. तर खडकीतील अनेक चौकात पान टपऱ्या रात्री बारा वाजेपर्यंत लपूनछपून सुरू असतात. त्याचप्रमाणे  उशिरापर्यंत दरवाजा बंद करून चायनीजची काही हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन शिवाजीनगर एसटी बस स्थानक समोर शासकीय दूध डेअरी जवळ तर ओळीने रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असतात. तसेच खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा याठिकाणी या बसेस मुले अपघात घडले आहेत तरीसुद्धा या बसेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.  शिवाजीनगर एसटी बसस्थानक शेजारीच अनेक पान टपऱ्या तसेच एक हॉटेल रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते या कडे खडकी पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील सोसायट्यांमधील काही नागरिक करीत आहेत. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दुकानांना हॉटेल व खाजगी बसेस यांना त्वरित बंदी घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेKhadkiखडकीPoliceपोलिस